शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

...तर राज्यात लवकरच भारनियमन; कोळशाचा पुरवठा ठप्प झाल्यानं वीज संकटाची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:50 IST

कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम; नाइलाजास्तव करावे लागेल भारनियमन

- सचिन लुंगसे मुंबई : वेस्टर्न कोल लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्रांना कोळशाचा अपुरा पुरवठा होत आहे. याचा परिणाम वीजनिर्मितीवर होत असून, राज्यातील विजेचे व्यवस्थापन करण्यासाठी महावितरणने खुल्या बाजारातून वीज विकत घेतली आहे. राज्याची दररोजची मागणी १५ हजार मेगावॅट असून, पुरवठाही तेवढाच आहे. मात्र कोळशाचा पुरवठा कमी होत असल्याने त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता भविष्यात महावितरणला नाइलाजास्तव भारनियमन करावे लागणार आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशामध्ये वेस्टर्न कोल लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) कर्मचाऱ्यांनी संप केल्याने राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रांना कोळशाचा अपुरा पुरवठा होत आहे. महाराष्ट्रातील विद्युत निर्मिती कंपनीची वीजनिर्मितीची क्षमता १० हजार मेगावॅटच्या वर असताना येथून केवळ २८०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. अदानी कंपनीची क्षमता ३ हजार मेगावॅट असताना येथून १७०० मेगावॅट वीज मिळत आहे. असे असतानाही महाराष्ट्रात भारनियमन होऊ नये यासाठी महावितरण प्रयत्न करीत आहे. महावितरण सर्वसाधारण २ हजार मेगावॅट वीज खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) ३ रुपये २० पैसे दराने घेत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक्सचेंजमधील वीज ही भरवशाची नसते. या कारणात्सव वीजनिर्मिती कंपन्यांनी यातून मार्ग काढून अधिकाधिक वीजनिर्मिती करणे गरजेचे आहे. दरम्यान, उद्या कोळशाचा पुरवठा कमी झाला; किंवा वीजनिर्मिती बंद पडली तर राज्यावर भारनियमनाचे संकट ओढविणार आहे.दररोज ३२ रॅक कोळशाची गरजसूत्रांच्या म्हणण्यानुसार, दररोज महानिर्मिती कंपनीला ३२ रॅक कोळशाची गरज आहे. मात्र रोज डब्ल्यूसीएलकडून १२ रॅक कोळसा मिळत आहे. कोळशाचा पुरवठा ठप्प झाला आणि वीजनिर्मिती ठप्प झाली तर महाराष्ट्र अंधारात जाईल. असे होऊ नये यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. १५ हजार मेगावॅटची मागणी असून, पुरवठाही तेवढाच आहे. आता व्यवस्थापन नीट होत आहे. मात्र भविष्याचे काय, याचे उत्तर तूर्तास कोणाकडेच नाही.

टॅग्स :electricityवीज