शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोळसाचोरीला राजाश्रय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 04:24 IST

वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातून सुरू असलेली कोळसा वाहतूक चोरट्यांच्या कचाट्यात सापडली आहे. कोळसा वाहतुकीदरम्यान महिन्याकाठी लाखो टन कोळशाची चोरी होत असून या चोरीला ‘राजाश्रय’ लाभल्याने प्रशासनाचेही हात बांधले गेले आहेत.

वणी (यवतमाळ) : वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातून सुरू असलेली कोळसा वाहतूक चोरट्यांच्या कचाट्यात सापडलीआहे. कोळसा वाहतुकीदरम्यान महिन्याकाठी लाखो टन कोळशाची चोरी होत असून या चोरीला ‘राजाश्रय’ लाभल्याने प्रशासनाचेही हात बांधले गेले आहेत. या कोळसाचोरीचा सर्वाधिक फटका वीज वितरण कंपनीला बसत आहे. वणी नॉर्थ क्षेत्रात उकणी, जुनाड, पिंपळगाव, कोलारपिपरी, भांदेवाडा, कुंभारखणी, घोन्सा अशा सात कोळसा खाणी आहेत. यांपैकी उकणी, जुनाड आणि भांदेवाडा या तीन कोळसा खाणी सुरू आहेत.उकणी ही कोळसा खाण सर्वाधिक नफा देणारी खाण म्हणून ओळखली जाते. या खाणीतून निघणारा कोळसाही उच्च दर्जाचा आहे. त्यामुळे तस्करांचाही या खाणीवर डोळा आहे. या खाणीतून ट्रकद्वारे दिवसरात्र कोळशाची वाहतूक सुरू असते. ५० ते ६० खेपा दररोज वणीच्या रेल्वे सायडिंगवर पोहोचत्या केल्या जातात. त्यानंतर येथून रेल्वेद्वारे हा कोळसा वीज वितरण कंपनीला पोहोचविलाजातो. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी अधिक खेपा टाकल्या जातात. त्यामागेही चोरीचा उद्देश असतो. रात्रीच्या वेळी उकणी व जुनाडा खाणीतून कोळशाने भरलेला ट्रक निघाल्यानंतर मार्गात तीन ते चार ठिकाणी थांबविला जातो. या ठिकाणी अगोदरच तस्करांचे हस्तकदबा धरून बसलेले असतात. ट्रक थांबताच, हे हस्तक ट्रकवर चढून त्या ट्रकमधून एक टनापर्यंत खोळसा खाली फेकतात. त्यानंतर ट्रक निघून जातो. खाली फेकलेला कोळसा मग हस्तकांजवळील मालवाहू पिकअप वाहनात भरला जातो. तेथून वणी येथील कोलडेपोवर आणून संबंधित व्यावसायिकांना तो विकला जातो. अशा तीन ते चार टोळ्या रात्रीच्या वेळी खाणीच्या मार्गावर कोळसा लुटण्यासाठी उभ्या असतात.गंभीर बाब ही की, अनेक वर्षांपासून कोळशाची लूट सुरू असली तरी कोळसा तस्करांच्या मुसक्या बांधण्यात आजवर कोणालाही यश आले नाही. 

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र