शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीत खोटी माहिती आढळल्यास गुन्हे नोंदवणार : सहकारमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 18:04 IST

कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल.

ठळक मुद्देलाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी चावडी वाचनाचा आधारसहकार आणि महसूल प्रशासनावर छाननीची जबाबदारीचावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९ : कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल. लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी चावडी वाचनाचा आधार घेण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी आलेल्या सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीसंदर्भात पत्रकारांना माहिती देताना दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असा दावा केला. ते म्हणाले, सर्व्हर डाऊन आणि अन्य कारणामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात शेतकºयांना अडचणी येत आहेत. त्यामुळे २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आॅनलाईन कर्जमाफीच्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. सहकार आणि महसूल प्रशासनावर छाननीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर चावडीवाचन घेतले जाईल. निकषात न बसणाºया खातेदारांना पुरेसे पुरावे न मिळाल्यास यादीतून वगळले जाईल. तसेच अपुरी माहिती असेल अशा खातेदारांचे पुरावे, माहिती त्यातून उपलब्ध  होईल. चावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल,  असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले.  यामुळे कर्जप्रकरणात पारदर्शिका येईल.------------------------सतर्क राहण्याचे आवाहनच्शेतकºयांच्या नावे सोसायटीचे चेअरमन आणि सचिवांनी कर्ज काढले अशा शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरून देऊ नयेत. यासंदर्भातील माहिती सहकार विभागाला द्यावी. कर्जाची रक्कम शेतकºयांनी जमा केल्यानंतर ती बँक खात्यात न भरता परस्पर वापरली असेल अथवा बेबाक दाखले देऊन शेतकºयांची बोळवण केली असेल अशा प्रकरणांची माहिती जिल्हा उपनिबंधकाकडे लेखी स्वरुपात द्यावी किंवा चावडी वाचनात पुरवण्यात यावी. कोणाच्याही दबावाला बळी न पडता शेतकºयांनी सतर्क राहून सहकार्य करावे, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले.