शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मुंबई बँकेत सहकार पॅनेलचा विजय

By admin | Updated: May 8, 2015 04:51 IST

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यात सत्तेत असलेले सेना-भाजपा या निवडणुकीत आमने-सामने उभे

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यात सत्तेत असलेले सेना-भाजपा या निवडणुकीत आमने-सामने उभे ठकल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत भाजपा आणि इतर पक्षांच्या सहकार पॅनेलने शिवसेनेला शह दिला आहे. एकूण २१पैकी तब्बल १७ जागा जिंकून सहकार पॅनलने आपले वर्चस्व राखले आहे.विविध आरोपांमुळे चर्चेत आलेल्या मुंबई बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी दादर येथील डिसिल्वा हायस्कूलमध्ये झाली. या निवडणुकीत सहकार पॅनेलने १७ जागा जिंकल्या आहेत; तर शिवसेनेतर्फे निवडणूक लढविणाऱ्या शिवप्रेरणा पॅनेलला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत सहकार पॅनेलचे शिवाजीराव नलावडे, प्रवीण दरेकर, नंदकुमार काटकर, सिद्धार्थ कांबळे, भिकाजी पारले हे नेते भरघोस मताधिक्याने निवडून आले आहेत. या वेळी सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यामध्ये काटकर यांनी इतर सहकारी संस्था मतदारसंघातून १३३८पैकी तब्बल ११४४ मते मिळवून विजय प्राप्त केला. तर मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून प्रवीण दरेकर व त्यांचे सहकारी आनंदराव गोळे यांनी एकूण ६८५पैकी अनुक्रमे ६२६ व ५४३ मते मिळविली आहेत. सहकार पॅनेलला भरघोस यश मिळत असताना पॅनेलचे ज्येष्ठ नेते एल.एच. गाजरे यांना व्यक्तिगत सभासदांच्या मतदारसंघातून अवघ्या १६ मतांनी पराभव पत्करावा लागला. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था मतदारसंघातून विद्यमान संचालक प्रदीप सामंत व मनसेचे कार्यकर्ते संजय घाडी यांना पराभव पत्करावा लागला.