शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री राज्यात काढणार विकासयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 05:48 IST

मुख्यमंत्री फडणवीस केंद्र व राज्य सरकारची कामगिरी सांगत १ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या काळात राज्यात विकासयात्रा काढणार आहेत.

मुंबई  - मुख्यमंत्री फडणवीस केंद्र व राज्य सरकारची कामगिरी सांगत १ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या काळात राज्यात विकासयात्रा काढणार आहेत. या यात्रेचे नाव ‘विकासयात्रा’ किंवा ‘दिसतोय फरक शिवशाही परत’ असे असेल.भारतीय जनता पक्षाने शनिवारी काही जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळूनही हे बदल करण्यात आले आहेत. नंदुरबारमध्ये खा. हीना गावित यांच्या जागी भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांना अध्यक्ष करण्यात आले.महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश बैठकीनंतर पत्रकारांना या बाबत माहिती दिली. नागपुरात सध्याचे अध्यक्ष आणि दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्या जागी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक प्रवीण दटके यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले. रमेश चिकोडे - कोल्हापूर शहर, विक्रम देशमुख - नंदुरबार, संजय पाटील - जळगाव ग्रामीण, नांदेड- दिलिप कंदकुर्ते आणि मालेगाव शहर -विवेक वारुळे असे नवीन अध्यक्षही नेमण्यात आले आहेत. बदलण्यात आलेल्या बहुतेक जिल्हाध्यक्षांची तीन वर्षांची मुदत आधीच संपली होती पण लोकसभा निवडणुकीमुळे नवीन अध्यक्षांची नियुक्ती लांबली होती.दुष्काळग्रस्तांना मदतराज्यात अब की बार शिवशाही सरकार हा आमचा निर्धार असून युती किमान २२० जागा जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील मुलींना ९ महिन्यांचा बसचा पास, कपडे तसेच पावसाळी बुट देण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवरील भाजपा कार्यकर्ते त्याची व्यवस्था करतील, अशी माहिती त्यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी पाच वाजता विधान भवनात दोन्ही सभागृहांतील युतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस