शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल खरेदीवर ‘लकी ड्रॉ’ बारगळल्याने गोंधळ

By admin | Updated: February 11, 2017 00:00 IST

इंडियन आॅईल कंपनीच्या वतीने आयोजित प्रोत्साहनपर लकी ड्रॉ कूपनची सोडत शुक्रवारी बारगळल्याने संत एकनाथ रंगमंदिर परिसरात नागरिकांनी कंपनीच्या विरोधात

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 10 -  इंडियन आॅईल कंपनीच्या वतीने आयोजित प्रोत्साहनपर लकी ड्रॉ कूपनची सोडत शुक्रवारी बारगळल्याने संत एकनाथ रंगमंदिर परिसरात नागरिकांनी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीच्या विक्री अधिकारी महिलेला नागरिकांनी व महिलांनी घेराव घातल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.  
२६ आॅक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत ५०० रुपये १००० रुपयांचे पेट्रोल- डिझेल खरेदीवर लकी ड्रॉ कूपन ठेवण्यात आले होते. या योजनेला जिल्हाभरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. परंतु १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४, ५, ८ अशा तीन टप्प्यात सोडत संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित केली होती. असे  त्या कूपनवरच स्पष्ट लिहिलेले असल्याने नागरिकांनी दरम्यानच्या काळात खरेदी केलेल्या पेट्रोलवरील कूपन सांभाळून ठेवले आहेत. रिक्षाचालकांपासून ते स्कूटीस्वारांनीही ५ ते २० कूपन घेऊन नशीब अजमावण्यासाठी उस्मानपुरा येथील रंगमंदिरासमोर सायंकाळी ४ वाजेपासून येऊन बसले. रात्री ८ वाजेपर्यंत याठिकाणी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी किंवा पंपचालकाचे कुणीदेखील फिरकले नाही. सोडत पुढे ढकलण्यात आली अशी शहरातील एकाही पंपावर सूचना  लावली नाही. कूपनवर प्रत्येकाचा फोन नंबर, नावाचा उल्लेख असताना त्यावरदेखील संदेश पाठविले नाही. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि एकच गोंधळ सुरू झाला. 
 
अंधारात का ठेवले...
पेट्रोल कंपनीने सामान्य ग्राहकांची फसवणूक केली असून, नागरिकांना बक्षिसांचे प्रलोभन दाखविल्याने पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत नागरिकांनी घोषणाबाजी सुरू केली. येथे दूध विक्रेता, चालक, दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षाचालक स्वप्न मनाशी बाळगून होते. आपल्याला बक्षीस लागेल या त्यांच्या स्वप्नावर शुक्रवारी पाणी फेरले. 
सोडत १० फेब्रुवारी रोजी ठेवली होती. काही तांत्रिक बाबीमुळे ती होऊ शकली नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती करून इंडियन आॅईल कंपनीच्या औरंगाबाद विभागाच्या विक्री अधिकारी महिलेला नागरिकांनी घेराव घातला होता. 
 
 आमचे प्रवास भाडे कोण देणार...
शुक्रवारी सोडत आहे, असे कूपनवरच जाहीर असताना जनतेच्या भावनाशी खेळणे चांगले नाही. जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, गंगापूर तसेच कूपन घेतलेल्या शेकडो नागरिकांनी प्रवास भाडे कोण देणार, असा जाब विचारणे सुरू करून अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. जनार्दन पवार, रमेश पोकलवार, फतरू शहा, विजय राजाळे, पवन कांबळे, स्नेहल त्रिभुवन, अण्णा म्हस्के पाटील आदींसह शेकडो नागरिकांनी जाब विचारला. अधिकारी महिलेसोबत लहान मूल असल्याने अखेर जनतेनेही काढता पाय घेतला. परंतु एक जमाव पोलीस ठाण्याकडे निघाला, रात्री उशिरापर्यंत क्रांतीचौक व उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. 
 
 कोटा पूर्ण न झाल्याने १० मार्चला सोडत...
१०० रुपयांपासून ते ५०० रुपये व  १००० रुपयांच्या खरेदी कूपनचा कोटा पूर्ण न झाल्याने कंपनीने आयोजित सोडत १० फेब्रुवारीला होऊ शकली नाही. तांत्रिक बाबीमुळे सूचना देण्याचेदेखील राहून गेले. मार्चला  ही सोडत ठेवण्यात आली आहे, असे इंडियन आॅईलच्या औरंगाबाद विभागाच्या विक्री अधिकारी अपेक्षा भदोरिया यांनी सांगितले.