शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

सभापतीच्या दादागिरीविरोधात काम बंद

By admin | Updated: April 4, 2017 04:03 IST

मासिक सभेच्या इतिवृत्तात बेकायदा फेरफार केल्याने पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींमध्ये जोरदार वादंग झाला.

वसई: मासिक सभेच्या इतिवृत्तात बेकायदा फेरफार केल्याने पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींमध्ये जोरदार वादंग झाला. त्यावेळी पिठासीन अधिकारी असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संतापलेल्या सभापतींनी सभेत दादागिरी करुन दहा मिनिटे गोंधळ घातला. अधिकारी, कर्मचारी, सदस्यांना दमबाजीही केली. त्यामुळे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सभात्याग केला. त्यानंतरही काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना फोनवरून धमक्या दिल्या जात असल्याने सोमवारी गटविकास अधिकाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच काळ््या फिती लावून निदर्शने केली. वसई पंचायत समितीच्या शनिवारच्या मासिक सभेत मोठा गदारोळ झाला. सभापती चेतना मेहेर यांनी सर्व संकेत पायदळी तुडवून कोरम पूर्ण झाला नसतानाही सभा सुुरु केली. इतकेच नाही तर इतिवृत्तात स्वत:च्या हस्ताक्षरात फेरबदल करून मंजुरी मिळण्याचा प्रयत्न केला. यासर्व गोष्टींना उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी आक्षेप घेतला. त्यावरून मेहेर आणि ठाकूर यांच्यात वाद सुरु झाला. यावेळी पिठासीन अधिकारी असलेल्या गटविकास अधिकारी शीतल पुंड यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभापती चेतना मेहेर यांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी सभागृहात असलेल्या सर्वांनाच दमबाजी सुरु केली. बांगड्या मागे सारुन मुठी टेबलावर आपटत माझ्यात दम आहे, मीच बैठक घेणार असे ठणकावून सांगितले. यावेळी पुंड, ठाकूर यांच्यासह काही अधिकारी समजावत असतांनाही मेहेर यांनी सर्वांनाच दमबाजी करीत रोखून धरले. त्यामुळे पुंड यांनी पीठासन अधिकारी म्हणून आपले ऐकले जाणार नसेल तर मी सभात्याग करते, असे सांगून सभागृह सोडले. त्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही सभात्याग केला. मेहेर यांचा गोंधळ सुरु राहिल्याने उपसभापती ठाकूर यांच्यासह सर्वच सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान, वसई पंचायत समितीत बहुजन विकास आघाडीचे सहा आणि श्रमजीवी संघटनेचे दोन मिळून आठ सदस्य आहेत. सभापती बहुजन विकास आघाडीच्या असताना त्यांनी सभागृहात उपसभापतींचाही अवमान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कालपासून काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना फोनवरून धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यामुळे गटविकास अधिकारी शितल पुंड यांनी सोमवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह काम बंद आंदोलन केले. तसेच कार्यालयासमोर काळया फिती लावून निदर्शने केली. सभापतींनी बेकायदा सभा सुरु केली. त्यानंतर इतिवृत्तात बेकायदेशीर फेरफार केले. पिठासीन अधिकारी म्हणून मला बोलू दिले नाही. चुकीची गोष्ट होऊ नये म्हणून मी हस्तक्षेप केला असता कामकाज करण्यापासून मला रोखले. टेबलावर मुठी आपटत दहा-पंधरा मिनिटे गोंधळ घातला. आता काही जणांना फोनवर धमकावले जात आहे. आम्ही पण माणसे आहोत. आम्हाला गुलाम म्हणून वागवू नका. इतकेच आमचे म्हणणे आहे. याप्रकरणी वरिष्ठांना सविस्तर अहवाल पाठवणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.सभापतींनी सर्व प्रथा परंपरा मोडून बेकायदेशीरपणे सभा सुरु केली. प्रशासनाला सादर केलेल्या इतिवृत्तात बेकायदेशीर बदल केले. सभागृहात जे घडले नाही ते इतिवृत्तात लिहीले. म्हणून मी हस्तक्षेप केला. पण, सभापती कुणाचेही म्हणणे ऐकून न घेत नव्हत्या. अर्वाच्य भाषा आणि दादागिरी करीत सभापतींनी सभागृहाचा अवमान केला आहे, असेही पुंड म्हणाल्या. (प्रतिनिधी)