जिल्हा परिषद : सभापतिपदाच्या आग्रहात वेळ निघून गेलीनागपूर : राज्यातील भाजप-शिवसेना युती व काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी मोडीत निघाल्याने जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीत समीकरण बदलणार होते. परंतु पदाच्या वाटाघाटी फिस्कटल्याने अखेरच्या क्षणी सत्ताबदल टळला. अन्यथा सत्तेत सर्वच पक्ष सहभागी असल्याचा दुर्मिळ योग घडून आला असता.जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बसपा, गोंगपा व रिपाइंला सभापतिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. सोबतच अध्यक्षपदाची संधी हुकल्याने पक्षातील नाराज सदस्यांनाही भाजप नेत्यांनी सभापतिपदाची ग्वाही दिली होती. परंतु विधानसभा निवडणुका विचारात घेता शिवसेना व भाजप नेत्यांनी गोंगपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. पक्ष सदस्यांच्या नाराजीचा विचार न करता शिवसेना-भाजप नेत्यांनी सभापतिपदी आपल्या मर्जीतील सदस्यांची वणीं लावण्याचा निर्णय घेतला. यात युतीचे संख्याबळ ३२ वरून ३० वर आले. त्यातच अंतर्गत वादात विषय समित्यांच्या निवडणुकीत पक्षाच्या सदस्यांना २८ मते मिळाली. जेमतेम एका मताने विजय मिळवून नामुष्की टळली. सभापतिपदावरून शिवसेनेतील मतभेद पुढे आले. खासदार कृपाल तुमाने व आमदार आशिष जयस्वाल यांनी उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या कक्षात सदस्यांशी बंदद्वार चर्चा केल्यानंतरही पुष्पा देशभ्रतार व अनुराधा इंगळे यांनी बंडाचा झेंडा उगारला. देशभ्रतार यांनी मतदानावर बहिष्कार टाकला तर इंगळे विरोधकांच्या बाजूने गेल्या. गोंगपाच्या दुर्गावती सरियाम यांना सभापतिपदासाठी दिलेला शब्द न पाळल्याने त्याही नाराज होत्या. तसेच भाजपचे केशव कुंभरे यांनीही सरियाम यांची बाजू घेत पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. नेत्यांचा आदेश झुगारून त्यांनी शिवसेनेच्या सभापतीला मतदान केले नाही. या घडामोडीत काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने बहुमत झाले होते.काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रसने गोंगपा व भाजप-शिवसेनेतील नाराज सदस्यांना हाताशी धरून सत्ता बदलाची रणनीती आखली होती. त्यांचे संख्याबळ ३० पर्यंत पोहचलेही होते. परंतु काँगे्रस नेत्यांनी ऐनवेळी दोन पदासाठी आग्रह धरला. या वाटाघाटीत वेळ निघून गेल्याने समीकरण जुळताजुळता राहून गेले. दरम्यान भाजपचे उकेश चव्हाण यांना मतदान करायचे की नाही अशा संभ्रमात शिवसेनेचे सदस्य होते. सुरुवातीला शिवसेना सदस्यांनी चव्हाण यांच्या बाजूने हात उंच के ले नव्हते. परंतु निवडणूक प्रक्रि या सुरू झाल्याने विचार करण्याला वेळ नसल्याने भाजप-शिवसेना युतीचे सभापती निवडून आले. (प्रतिनिधी)
अखेरच्या क्षणी सत्ताबदल टळला
By admin | Updated: October 7, 2014 00:52 IST