शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

भाषांच्या तोंडी परीक्षा होणार बंद

By admin | Updated: July 15, 2017 05:31 IST

गेल्या काही वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात मिळणारे गुण पाहून अनेक तज्ज्ञ व्यक्तीही थक्क होतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात मिळणारे गुण पाहून अनेक तज्ज्ञ व्यक्तीही थक्क होतात. अनेक विद्यार्थ्यांना भाषा विषयातली ९० ते ९५ गुण मिळतात. शाळेमार्फत दिल्या जाणाऱ्या २० गुणांमुळे गुणांत वाढ होते, परंतु आता इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. भाषा विषयांसाठी २० गुणांची तोंडी परीक्षा आणि ८० गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत आता बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांचा १०० गुणांचा पेपर लिहावा लागणार आहे. शाळेकडून घेतली जाणारी २० गुणांची तोंडी परीक्षा बंद होईल. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठीही हाच नियम असेल. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, द्वितीय भाषांची तोंडी परीक्षा घेतली जात होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांना गुण देण्याची मुभा ही शाळांना असल्याने शिक्षकांकडून अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जात होते. त्यामुळे दहावीचा अंतिम निकाल फुगलेला दिसून येत होता. याचा परिणाम वाढत्या टक्केवारी स्वरुपात दिसून येत होता. याविषयी अनेक शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिक्षणमंत्र्यांनाही याची माहिती दिली होती. त्यानंतर, गेल्याच महिन्यात राज्य शिक्षण मंडळाने नववी आणि दहावीसाठी अभ्यासक्रम बदलांचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पुण्यात पार पडली होती. त्या वेळी परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी या संदर्भातील परिपत्रक जाहीर केले. परिपत्रकानुसार, भाषा विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. तर संयुक्त भाषा विषयांसाठी ५० गुण प्रत्येकी असा नवा पॅटर्न तयार करण्यात आला आहे. या परिपत्रकात भाषा विषयांची तोंडी परीक्षा यापुढे न घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण कळतील, असे मत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. अशी होणार परीक्षा संपूर्ण भाषा विषयांसाठी १०० गुणांची, तर संयुक्त भाषा विषयांसाठी प्रत्येकी ५० गुणांची लेखी परीक्षा.गणित हा १०० गुणांचा विषय. यातील ८० गुण लेखी आणि २० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी. ८० गुणांमध्ये ४० गुण बीजगणित आणि ४० गुण भूमितीसाठी.विज्ञान-तंत्रज्ञान विषयाची २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार. ८० गुणांमध्ये भाग १ व भाग २ प्रत्येकी ४० गुणांचा.सामाजिकशास्त्रे या विषयांतर्गत इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल मिळून १०० गुण. इतिहास ४०, राज्यशास्त्र २० व भूगोल ४० अशी गुणांची विभागणी.यापुढे श्रेणी विषयांची लेखी परीक्षा होणार नाही. आरोग्य व शारीरिक शिक्षण, स्व-विकास व कलारसास्वाद, संरक्षणशास्त्र, एमसीसी हे श्रेणी विषय आहेत.