शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

महासत्तेकडे जाण्यासाठी प्राप्तिकर पद्धत बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 04:55 IST

मुंबई : अमेरिका आणि चीनसारखे देश शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे.

मुंबई : अमेरिका आणि चीनसारखे देश शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. पुढच्या काही वर्षांत भारत महासत्ता होणार असल्याचे म्हटले जाते. पण, प्रत्यक्षात हे स्वप्न साकार करायचे असल्यास प्राप्तीकर पद्धत बंद करा, असे प्रतिपादन भाजपा नेते व खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.व्हीजेटीआय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ‘भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यास आवश्यक तत्त्वे’ या विषयावर ते म्हणाले, मुळातच भारताची अधोगती ही स्वातंत्र्यापासून सुरू झाली आहे. कारण, भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी चुकीचेधोरण स्वीकारले. त्यांच्याधोरणामुळे आर्थिक महासत्तेकडे जाण्याची वाटचाल चुकीच्या पद्धतीने झाली.स्वतंत्र भारतात आर्थिक धोरण स्वीकारताना रशियाचा आदर्श ठेवला गेला. त्यामुळे रशियाचे आर्थिक धोरण स्वीकारून आर्थिक वाटचाल सुरू केली. रशियाचे कृषीप्रधान धोरण भारताने स्वीकारले. त्यामुळे देशात जमीनदारी पद्धत अस्तित्वात आली. याची परिणीती म्हणजे देशाला अन्नटंचाईला सामोरे जावेलागले. पण, त्यातून लाल बहादूर शास्त्री यांच्या धोरणामुळे देश बाहेर आला. त्यांनी स्वीकारलेल्या हरितक्रांती धोरणामुळे अर्थव्यवस्थेत सुस्थिती यायला लागली. आज याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत.संपूर्ण जगाला पोसायची धमक भारताकडे आहे. पण, यामुळे भारत महासत्तेकडे वाटलाच करतानाअडथळे येऊ शकतात. हे टाळण्यासाठी काही निर्णय बदलले पाहिजेत, असे मत सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.>संशोधनाची गरजअमेरिकेत सातत्याने नवे संशोधन होत असते. नवनवीन उपक्रम तेथे राबविले जातात. पण, असे आपल्या देशात होताना दिसत नाही. नवीन गोष्टी करण्यासाठी भारतीय धजावत नाहीत. हे टाळण्यासाठी तरुणांनी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल, अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी