शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तोट्यातील महामंडळे बंद करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 04:41 IST

कॅगची शिफारस : गृहमंत्री शिंदे यांनी सादर केला वित्त व्यवस्थेवरील लेखापरीक्षण अहवाल

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ राजकीय सोय म्हणून तोट्यातील महामंडळे, ग्रामीण बँका, संयुक्त कंपन्या, सहकारी आणि विभागीय वाणिज्यिक उपक्रम सुरू ठेवण्याबाबत भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यापेक्षा ती बंद करावीत, अशी शिफारस आपल्या अहवालात केली आहे.

तसेच तोट्यातील कंपन्यांंमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर परतावे मिळण्याची संधी दुर्लभ आहे.म्हणून सरकारने भविष्यात या कंपन्यांना समभागाऐवजी अनुदानाच्या रूपाने प्रदाने करावीत. जेणेकरून गुंतवणुकीच्या तुलनेत परताव्यामधील फरक कमी होईल, असा सल्ला कॅगने दिला आहे. विधानसभेत शुक्रवारी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅगचा राज्याच्या वित्त व्यवस्थेवरील लेखापरीक्षण अहवाल सादर केला. ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ३२ सार्वजनिक उपक्र म तोट्यात होते आणि त्यांचा निव्वळ तोटा हा ४९ हजार १९२ कोटी इतका होता, असे कॅगने म्हटले आहे. त्यामुळे या उपक्र मांचे सरकारने पुनर्विलोकन करावे, असे उपक्रम बंद करण्यासाठी अथवा त्यांच्या पुनरूज्जीवनासाठी तातडीने पावले उचलावीत. शासकीय कंपन्या, संयुक्त कंपन्या, भागीदारी आणि वैधानिक महामंडळांमधील राज्य शासनाच्या गुंतवणुकीवरील सरासरी परतावा मागील २०१३-१८ दरम्यान ०.०४ टक्के इतकाच होता. तर, शासनाने याच कालावधीत घेतलेल्या कर्जावर सरासरी ८ टक्के दराने व्याज दिले याकडे कॅगने लक्ष वेधले आहे. अशाप्रकारे, महामंडळांमधील शासनाची गुंतवणूक कशी अव्यहार्य आहे यावर कॅगने नेमके बोट ठेवले आहे. येत्या चार वर्षांत राज्याला जवळपास सव्वालाख कोटी रूपयांची परतफेड करायची आहे. तर पुढील सात वर्षांत १ कोटी ८४ लाख ३५६ म्हणजेच ५६.३७ टक्के कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. परिणामी सरकार कर्जाच्या जाळ्यात अडकू शकते, ते टाळण्यासाठी विचारपूर्वक योजना आखावी, असे अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.

कर्जाच्या परताव्यासाठी विचारपूर्वक योजना आखा४४ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आणि २ लाख कोटींची दिलेली हमी अशा परिस्थितीत असलेल्या राज्य शासनाला कॅगच्या या अहवालात काही मोलाचे सल्ले देण्यात आले आहेत. कर्जाची परतफेड करण्यासाठी विचारपूर्वक योजना आखा. कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकार नवे कर्ज घेते व त्याने बोजा अधिक वाढतो या बाबत शासनाला सचेत करण्यात आले आहे. कर्ज फेडण्यासाठी सरकार नवे कर्ज घेत असल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे. २०१३ ते १८ या दरम्यान कर्ज परतफेडीचा खर्च ३४ हजार ८९७ कोटी रूपये होता. हा खर्च ३९ हजार ६०० कोटीच्या खर्चातून भागवण्यात आला. कर्जाचा मोठा हिस्सा कर्ज चुकवण्यासाठी खर्च होतो हे स्पष्ट आहे. अशामुळे प्रगतीला चालना देण्यासाठी, विकास कामांवरील खर्च भागवण्यासाठी कर्जाचा अतिशय कमी भाग उपलब्ध होतो.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी