शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्तींची इंटरनेट सेवा बंद करा

By admin | Updated: August 11, 2015 01:46 IST

आरडीएक्सद्वारे मुंबईत मृत्यूचे तांडव घडविणाऱ्या याकूब मेमनला फाशी द्यायला २२ वर्षे लागली. सर्वसामान्यांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात, पायऱ्या झिजवाव्या लागतात.

ठाणे : आरडीएक्सद्वारे मुंबईत मृत्यूचे तांडव घडविणाऱ्या याकूब मेमनला फाशी द्यायला २२ वर्षे लागली. सर्वसामान्यांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात, पायऱ्या झिजवाव्या लागतात. याकूबसाठी पहाटे तीन वाजता सर्वोच्च न्यायालय सुनावणीला बसतात. याकूबच्या सुनावणीला २२ वर्षे आणि गणेशोत्सवातील मंडप आणि डिजेचा निर्णय एकदम झटकन? दहीहंडी म्हणे फक्त २० फूटापर्यंत बांधायची. मग ती घरातच फोडायची का, असे सवाल करुन न्यायालयांच्या निर्णयांवर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. न्यायमूर्तींची वर्तमानपत्रे, नेट सर्व काढून घ्या मग पहा निर्णय कसे वेगाने होतील, असे सांगून प्रलंबित खटल्यांबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. न्यायालयाचा आदर आहेच. तो घालवू नका इतकीच अपेक्षा आहे. राम जेठमलानी, नसरुदीन शहा हे याकुबची फाशी टाळण्यासाठी पत्र देतात? देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचे वकील पत्र घेणाऱ्या जेठमलांनींना तर कधीच माफ करणार नाही. छोटा शकीलच्या मुलाखती माध्यमे देतात. याकुबने काय खाल्ले, तो काय बोलला हे सर्व प्रसिद्ध होते. हा काय तमाशा आहे, सलमान खानच्या खटल्यालाही १२ वर्षे लागली. कसले संशोधन सुरु होते, असा सवाल त्यांनी केला. आवैसी बंधूंवरही त्यांनी सडकून टीका केली. त्यांनी जर महाराष्ट्रात वेडेवाकडे करण्याचा प्रयत्न केला तर गाठ राज ठाकरेंशी गाठ आहे. रस्त्यावर फोडून काढेन, असा इशाराही दिला. जिथे मुख्यमंत्री राहिले त्या घरातील महिलेने आत्महत्या केली. दुष्काळ, सिंचन आणि टोलचे प्रश्न तसेच आहेत. फक्त तोंडे बदलली. साध्या अंतर्गत बदल्यांसाठी १०० कोटींचा भ्रष्टाचार. देवेंद्र फडणवीस माणूस म्हणून चांगले. पण त्यांचेही हात पाय बांधलेत. जाती पातीचेही र ाजकारण केले जातेय. त्यामुळे जाती पातीला थारा देऊ नका, मराठी आहात महाराष्ट्रासाठी झटा... जिथे जिथे मराठी माणसांवर अन्याय होईल, तिथे तिथे अन्यायाला तीव्र प्रतिकार झालाच पाहिजे, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यातील कार्यकर्त्यांना दिला.गडकरी रंगायतन येथे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या मेळाव्यात त्यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि न्यायालय आणि प्रसार माध्यमांचा खरपूस समाचार घेतला. तत्पूर्वी, राज यांनी गडकरी रंगायतन बाहेर सेल्फी केंद्राचे उद्घाटन केले. ते म्हणाले, मराठी राजभाषा आहे, हे ५५ वर्षांनतर सरकारला कळाले. मुंबई ठाण्यात रिक्षा चालकांसाठी नविन परमिट दिली जात असल्याचे मराठी तरुणांना माहितच नाही. यात केवळ ६० टक्के उत्तर भारतीय तर ३० ते ४० टक्के बांग्लादेशी आहेत. यांना पोसायचे काम भाजपावालेच करीत आहेत. बनावट आधारकार्ड वाटतांना एका भाजपच्याच कार्यकर्त्याला पकडल्याचा दाखलाही त्यांनी दिला. जे काँग्रेसने केले तेच भाजपवाले करताहेत. कोकणात अतिरेकी घुसल्याच्या वृत्ताचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. मोदी मात्र मन की बात की मौन की बात करताहेत. मोदींनी बोलले पाहिजे की, अतिरेक्यांसदर्भात भाष्य करुन नागरिकांना भयमुक्त केले पाहिजे. ते नुसते गुजरात गुजरात जप करीत राहिले तर मग देशाचे काय होणार. (प्रतिनिधी)

मराठी मुलांनाच नोक-या.. - मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना रिक्षांचे परवानेही मिळाले पाहिजेत. यासाठी मनसेच्या वाहतूक सेनेने जागरुक राहिले पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल, मराठी माणसाला त्रास होईल, तिथे तुम्ही मशालीसारखे रहा.त्यांना आधार द्या नुसते कार्ड बनू नका असा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. - मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात कंपन्या जरुर आणाव्यात पण तिथे मराठी मुलांनाच नोकऱ्या दिल्या पाहिजेत, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला. आव्हाडांचा उल्लेख वळवळया..राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच अनेक समस्या निर्माण झाल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. ९२ वर्षांच्या बाबासाहेब पुरंदरे यांचा जातीपातीच्या राजकारणात नाहक बळी घेतला जातोय. यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबद्दल समिती नेमली होती. पण यांना चर्चा नको. जातीचे विष पेरले जातेय. आधी पुरंदरेंचे नाव महाराष्ट्र भूषण म्हणून आणले जाते. नंतर त्यांच्यावर राजकारण केले जाते. राष्ट्रवादी नावाचा पक्ष आला तेंव्हापासूनच हे सर्व सुरु आहेत. शरद पवार हे कसले जाणता राजा आहेत. ज्या महाराष्ट्राने चांगला विचार दिला, तोच महाराष्ट्र जाती पातीत खितपत पडलाय. ठाण्यातले ते एक वळवळतय, असेही पुरंदरे यांच्यावर टीका करणाऱ्या आव्हाड यांचा उल्लेख केला.उद्धव आणि माझी भेट ही मिडीयाचीच बातमी...एका फार्महाऊसवर उद्धव आणि माझी भेट झाल्याची बातमी माध्यमांनीच पेरली. त्यांना पेरायला कोण लावतेय? असा सवाल करीत भाजपाला घाबरविण्यासाठी या बातम्या पसरविल्या जातायेत. राज यांचे भाषण सुरु असतांनाच ठाण्याच्या शांतीनगरच्या एका महिलेने मध्येच व्यतय आणण्याचा प्रयत्न केला. इमारती पडतायेत, पालिकेचे अधिकारी न्याय देत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. या महिलेची कैफियत नंतर त्यांनी ऐकून त्यासंदर्भात शहराध्यक्ष राजेश जाधव यांना लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी दिले.