शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती लपवून ठेवणाऱ्याला मंदिर स्वच्छतेची शिक्षा

By admin | Updated: August 5, 2016 23:49 IST

येथील दिंगबर जैन मंदिरात २०११ मध्ये चोरी होवून यात मंदिरातील पार्श्वनाथ, तीर्थकर व बाहूबलीच्या मूर्त्या लंपास करण्यात आल्या होत्या.

ऑनलाइन लोकमतकळंब, दि. ५ : येथील दिंगबर जैन मंदिरात २०११ मध्ये चोरी होवून यात मंदिरातील पार्श्वनाथ, तीर्थकर व बाहूबलीच्या मूर्त्या लंपास करण्यात आल्या होत्या. या चोरी झालेल्या मूर्त्या स्वत:च्या दूकानात ठेवून घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने कळंब न्यायालयाने एकास कळंब येथीलच दिगंबर जैन मंदिर महिन्यातून दोन वेळेस साफ करण्याची शिक्षा सुनावली आहे. तसेच स्वच्छता केली जातेय की नाही याचा दर तीन महिन्याला मंदिर समितीने अहवाल द्यावा असे आदेशात नमूद केले आहे.

कळंब शहरातील कथले चौक भागात दिंगबर जैन मंदिर आहे. या मंदिरात आॅक्टोबर २०११ मध्ये चोरी होवून मंदिरातील पार्श्वनाथ, चोवीस तीर्थकर व बाहुबलीच्या मुर्तीसह इतर सात मुर्त्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी कळंब पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच तपास चालू केला होता. दरम्याच्या काळात आकाश जावळे व संदीप कदम या शाळकरी मुलांनी सदरील मूर्त्या चोरल्याचे निर्दशनास आले होते. सदरील घटनेची सखोल चौकशी झाली असता सदरील मुलांनी मुर्त्या कळंब येथीलच नितीन गोपाळ लांडगे यांच्या दुकानात लपवून ठेवल्याचे कबूल केले होते

त्यावर पोलिसांनी नितीन गोपाळ लांडगे यांच्या दुकानातून मुर्त्या ताब्यात घेतल्या होत्या आणि संबंधित दोघांविरूद्ध चोरीचा तर लांडगे याच्या विरुध्द चोरीचा माल घेतल्या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. उपरोक्त आरोपींवर कळंब न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी वकील अ‍ॅड प्रताप कवडे यांनी सादर केलेला पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी नितीन लांडगे यास चोरीच्या मुर्त्या स्वत:च्या दुकानात ठेवून घेतल्या प्रकरणी दोषी धरण्यात आले.

यावरून कळंब येथील प्रथम वर्ग न्यायधीश पी. एम. उबाळे यांनी नितीन लांडगे यास कळंब येथील दिगंबर जैन मंदिरात महिन्याच्या प्रत्येक १ व १६ तारखेला जावून स्वच्छता करण्याची शिक्षा सुनावली आहे. ही स्वच्छता वर्षभर करावी तसेच स्वच्छते संदर्भात मंदिर समितिने दर तीन महिन्याला न्यायालयात अहवाल सादर करावा, असेही निर्णयात नमूद केले आहे.