शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
5
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
6
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
7
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
8
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
9
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
11
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
12
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
13
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
14
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
15
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
16
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
17
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
18
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
19
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
20
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!

स्वच्छता दूताच्या सासूलाच उघड्यावर शौचास जाताना पकडले

By admin | Updated: December 26, 2015 02:38 IST

वाशिम येथील प्रकार; गुडमॉर्निंग पथकाची कारवाई.

वाशिम : शौचालय बांधण्यासाठी मंगळसूत्र विकल्याने प्रकाशझोतात आलेल्या, राज्याच्या स्वच्छता दूत संगीता आव्हाळे यांच्या सासूला उघड्यावर शौचास जाताना गुडमॉर्निंग पथकाने शुक्रवारी पकडले. मंगरूळपीर तालुक्यातील सायखेड येथील संगीता आव्हाळे यांनी मंगळसूत्र विकून घरात शौचालय बांधले. त्यांच्या या कार्याची दखल घेत, शासनाने त्यांचा राज्याच्या स्वच्छता दूत म्हणून गौरव केला. शौचालयाचे महत्व राज्यभर पसरविण्याची जबाबदारी शासनाने त्यांच्या खांद्यावर टाकली. दरम्यान, उघड्यावर शौचास जाणार्‍या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने गुडमॉर्निंग पथक कार्यान्वित केले असून, हे पथक गावोगावी धाड टाकत आहे. २५ डिसेंबर रोजी गुडमॉर्निंग पथकाने सायखेडा येथे धाड टाकली असता, यावेळी संगीता आव्हाळे यांच्या सासूला पकडण्यात आले. गुडमॉर्निंग पथकातील सदस्यांनी त्यांना उघड्यावर शौचास जाणे चुकीचे असल्याचे सांगितले. तुमच्या सूनच राज्याच्या स्वच्छता दूत असताना, तुम्हीच शौचालयाचा वापर न करणे चुकीचे असल्याची समजही त्यांना दिली. संगीता आव्हाळे माहेरी गेल्या असल्यामुळे त्यांची या मुद्यावर प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र तिचे पती नारायण आव्हाळे यांनी मात्र घरी सहा-सात सदस्य आहेत. शौचालयात बाबा गेल्यामुळे, आईला बाहेर जावे लागले असल्याची त्यांनी सारवासारव केली.