शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

सफाई कामगार संपावर जाणार

By admin | Updated: April 7, 2017 02:02 IST

सफाई कामगारांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनने १८ एप्रिलपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने रस्ते सफाईसाठी आणलेल्या यांत्रिक झाडूला विरोध करत सफाई कामगारांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनने १८ एप्रिलपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे देशाच्या आर्थिक राजधानीतच तीनतेरा वाजतील, अशी प्रतिक्रिया युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुखदेव काशिद यांनी व्यक्त केली आहे.यांत्रिक झाडूसह अन्य मागण्यांसाठी सफाई कामगारांनी गुरुवारी आझाद मैदानात इशारा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो महिला व पुरुष सफाई कामगारांनी हजेरी लावली. महापालिकेच्या यांत्रिक झाडूच्या प्रकल्पाविरोधात युनियन १३ एप्रिलपर्यंत वॉर्डनिहाय आंदोलन करणार आहे. त्यानंतरही हा प्रकल्प रद्द केला नाही, तर १८ एप्रिलपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसणार असल्याचे काशिद यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मुंबईत निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांना महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असेही काशिद यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन खात्यात एकूण ३१ हजार ७६५ कामगार काम करत असून दत्तकवस्ती, मॅनिंग मॅपिंग, हैदराबाद पॅटर्न, एनजीओ अशा पद्धतीने १५ हजार कंत्राटी कामगार काम करत आहेत. प्रशासनाच्या एरिया बेस कंत्राटी पद्धतीमुळे त्यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती संघटनेचे उपाध्यक्ष शशांक राव यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)सफाई कामगारांच्या प्रमुख मागण्या सफाई कामगारांची सेवानिवासस्थाने दुरुस्त करणे किंवा त्याच ठिकाणी त्यांची पुनर्बांधणी करणे किंवा मालकी हक्काने घरे देणे.२००५ सालापासून ४० हजार कामगार कालबद्ध पदोन्नतीसाठी पात्र झाले असून त्यातील फक्त १० हजार ७४२ कामगारांना कालबद्ध पदोन्नती मिळाली आहे. परिणामी, कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने द्यावी. वारसाहक्क प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत. सर्व चौक्यांवर शौचालये, स्नानगृह, लॉकर्स, महिला कर्मचाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या अशा सुविधा उपलब्ध करून द्या.