शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

स्वच्छ महाराष्ट्र अभियान ‘अधुरेच’

By admin | Updated: March 5, 2016 02:15 IST

पनवेल नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात ३० नवीन शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे अभियान राबविताना शासनाच्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे.

नामदेव मोरे,  नवी मुबईपनवेल नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात ३० नवीन शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे अभियान राबविताना शासनाच्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक प्रभागात आठवड्यातून एक दिवस श्रमदान अभियान राबविणे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह पालिकेच्या प्रत्येक सभेत कामाचा आढावा सादर केला जात नाही.राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून पनवेलची ओळख आहे. परंतु पहिले हागणदारीमुक्त शहर बनविण्यास येथील प्रशासनास अपयश आले आहे. १६४ वर्षांच्या वाटचालीमध्ये शहरात फक्त ५१ ठिकाणी शौचालये उभारण्यात आली आहेत. केंद्र शासनाने २०११ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये शहरात ४३,४४६ घरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामधील ३७,६५३ घरांमध्ये वैयक्तिक शौचालय आहे. ४,८१३ घरांमध्ये वैयक्तिक शौचालय नाही. या अहवालाप्रमाणे ३,९१७ कुटुुंबातील नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था असून, १,१२७ घरातील नागरिकांना अद्याप उघड्यावर शौचास जावे लागत आहे. पालिकेच्या २०१४च्या शहर स्वच्छता आराखड्याप्रमाणे ४०,९७७ घरांमध्ये शौचालय असून ४,३१० घरांमध्ये ही सुविधा नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक नगरपालिकेने सार्वजनिक प्रसाधनगृहांची उभारणी व देखभाल याकडे गांभीर्याने लक्ष दिलेच नाही. यामुळे शहराची लोकसंख्या १ लाख ८० हजार झाल्यानंतर व या ठिकाणी रोज हजारो नागरिक कामानिमित्त येत असताना त्यांच्यासाठी पुरेशी प्रसाधनगृह उभारण्यात अपयश आले आहे. मार्केट, बसस्टॉप व इतर महत्त्वाच्या ठिकाणीही नागरिकांसाठी ही सुविधा नाही. शहरात झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची संख्या ९ हजारांपेक्षा जास्त आहे. याशिवाय बेघर नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून या सर्वांसाठी फक्त ३६१ सीट्सच उपलब्ध आहेत. ३,९१७ कुटुंबांतील सदस्य सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत असल्याचा दावा केला आहे. परंतू वास्तवात हा आकडा योग्य नसल्याचे बोलले जात आहे. शहरात पालिकेने बांधलेल्या अनेक शौचालयांची अवस्था बिकट आहे. शिवाजी चौकामध्ये महिलांच्या शौचालयामध्ये पुरुषांचा वावर असल्याचे अनेक वेळा पाहावयास मिळाले आहे. पालिकेतील राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते शिवदास कांबळे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेताना या विषयाकडे लक्ष वेधले होते.३० ठिकाणी शौचालये !नगरपालिकेने शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. या अभियानाअंतर्गत जवळपास ३० ठिकाणी शौचालये बांधली जाणार आहेत. यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. परंतु या अभियानामध्ये फक्त शौचालय उभारणे अभिप्रेत नाही. घनकचऱ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करण्यावरही लक्ष देण्याच्या सूचना आहेत. स्वच्छतादूतांचा वापर करणेसिन्नरमधील सुवर्णा लोखंडे, वाशीममधील संगीता आव्हाडे व यवतमाळमधील चैताली राठोड या महिलांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शौचालय उभारल्यामुळे शासनाने त्यांना स्वच्छतादूत म्हणून घोषित केले आहे. नगरपालिकेने जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये या स्वच्छतादूतांना सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु या सूचनांचेही योग्यपद्धतीने पालन केले जात नाही.नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक शौचालये नाहीत. जी आहेत त्यांची स्थितीही बिकट आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानामधील अनेक सूचनांचे पालन केले जात नाही. शहरात स्वच्छतादूतांची घोषणाही केली जात नाही. प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या सुविधेसाठी योग्य त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असावे व त्याच्या देखभालीची यंत्रणा निर्माण करावी यासाठी पाठपुरावा करत आहोत. -शिवदास कांबळे, गटनेते व शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी> अभियानासाठी शासनाच्या सूचना प्रत्येक प्रभागात आठवड्यातून एक दिवस श्रमदान मोहीम राबविण्यात यावी.अभियानात सहभागी झालेले नगरसेवक, नागरिक, संस्था यांची नोंद ठेवण्यात यावीश्रमदान मोहिमेची छायाचित्र काढण्यात यावीत.पालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत अभियानाच्या कामाचा आढावा सादर करावा. श्रमदानामध्ये सहभागी नागरिक व त्यांनी केलेल्या कामांच्या तपशिलाची नोंद ठेवावी.शहरातील ओल्या - सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.