शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कलंकित मंत्र्यासाठी ‘क्लीन चिट’ योजना

By admin | Updated: July 23, 2016 02:16 IST

अवघ्या २० महिन्यांत २० मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात फसले असून, सरकारने विश्वासार्हता गमावली आहे.

मुंबई : अवघ्या २० महिन्यांत २० मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात फसले असून, सरकारने विश्वासार्हता गमावली आहे. भ्रष्ट मंत्र्याना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट एक खिडकी योजना’ आणि ‘गुन्हे माफ योजना’ सुरू करावी, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी फडणवीस सरकारचा समाचार घेतला. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्षांनी नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला विखे-पाटील यांनी सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी अनेक मंत्र्यांवर पुराव्यांसह थेट आरोप केले. आरोग्य राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच दलित समाजाबद्दल डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच अवमानजनक विधान केले होते. जातीवाचक अपशब्द वापरल्याबद्दल यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. नाशिकपासून नेरूळपर्यंत पोलिसांत अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चव्हाणांची नेमकी कोणती कामगिरी पाहून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला, अशी विचारणा विखे यांनी केली. पर्यटन मंत्री जयकुमार रावल, कामगार मंत्री संभाजीराव पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर असलेल्या आरोपांची जंत्रीच विखे यांनी यावेळी सादर केली.एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीत मूलभूत प्रश्नांची उत्तरेच मिळालेली नाहीत. तरीही त्यांना क्लीन चिट दिल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप घेतला. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या काळातील औषध खरेदी घोटाळ्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, आरोग्य मंत्र्यांच्या कारभाराला कंटाळून त्यांच्या खासगी सचिवापासून चालकापर्यंत संपूर्ण कर्मचारीवर्ग त्यांना सोडून गेला आहे. यासोबतच त्यांनी इतरही अनेक मंत्र्यांच्या विविध प्रकरणांचा उल्लेख करून, असेच सुरू राहिल्यास मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील कागदपत्रांच्या प्रदर्शनासाठी गांधी भवन सभागृहाऐवजी पुढील वेळी ते वानखेडे स्टेडियमवर हे प्रदर्शन भरवावे लागेल, असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला. (प्रतिनिधी)>निकष काय आहेत?गेल्या दोन वर्षांत मंत्रिमंडळात समावेश करताना निकष काय आहे? जास्त बदनामी हा आहे की की ओरिजनल असणे, हे आधी स्पष्ट करायला हवे. ओरिजनलवर कितीही आरोप झाले, भ्रष्टाचार केला, तरीही त्याची वर्णी लावली जात आहे. यामुळे आमच्यातून तिकडे गेलेल्या विजय गावित, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर यांचा मंत्रिमंडळात नंबर लागला नाही. मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांना असा धक्का दिला जातो की ते थेट चौथ्या रांगेत जातात, असे खडसे यांच्याकडे पाहात जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा पिकला.