शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चौपाट्यांची नीट साफसफाई करा

By admin | Updated: July 4, 2016 05:00 IST

सर्व चौपाट्यांवरील साफसफाई अधिक चांगल्या प्रकारे व सुयोग्य पद्धतीने व्हावी यासाठी विशेष काळजी घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित उपायुक्तांना दिले

मुंबई : महापालिका क्षेत्रातील सर्व चौपाट्यांवरील साफसफाई अधिक चांगल्या प्रकारे व सुयोग्य पद्धतीने व्हावी यासाठी विशेष काळजी घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित उपायुक्तांना दिले आहेत. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले.गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटीप्रमाणेच विस्तारित वर्सोवा चौपाटीवरदेखील मशीनद्वारे साफसफाई करण्यात यावी; तसेच या चौपाटीच्या साफसफाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ दिले जावे, असे आदेश आयुक्तांनी दिले. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत विशेष काळजी घेण्यात यावी व खड्डे तत्काळ भरण्याची कार्यवाही संबंधित विभागांनी प्राधान्याने करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले. महापालिका क्षेत्रातील विविध व्यावसायिक आस्थापना विशेषत: मॉल्स, मल्टिप्लेक्स येथील वाढीव बांधकामे, अग्निसुरक्षेच्या दृष्टीने नियमानुसार आवश्यक असणाऱ्या मोकळ्या जागा याबाबत कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे तसेच अग्निसुरक्षा उपकरणे अद्ययावत व कार्यरत असल्याची खात्री करून घेण्याचे आदेश महापालिकेच्या सर्व विभागीय आयुक्तांना व संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत देण्यात आले.सहआयुक्त शांताराम शिंदे हे सेवानिवृत्त होत असल्याने आयुक्तांच्या हस्ते शिंदे यांचा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)