शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

लग्नातील अहेराच्या पैशांतून बांधल्या वर्गखोल्या

By admin | Updated: July 14, 2017 05:02 IST

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी दोन वर्गखोल्या बांधून ठाणे येथील शिर्वन व सायली ठाणेकर या नवदाम्पत्याने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला

वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : लग्नात मिळालेल्या अहेराच्या रकमेतून वाडा तालुक्यातील नांदणी गायगोठा (कळंभई) येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी दोन वर्गखोल्या बांधून ठाणे येथील शिर्वन व सायली ठाणेकर या नवदाम्पत्याने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे.शिर्वन व सायली ठाणेकर यांनी शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या या आश्रमशाळेची वर्गखोल्यांची कमतरता लक्षात घेऊन इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे साडेसहा लाख रुपये खर्च करून दोन खोल्या बांधून दिल्या. आदिवासी विद्यार्थ्यांबाबत संवेदनशील असणाऱ्या ठाण्यातील वीणाताई ज्ञाते या वाडा तालुक्यातील नांदणी-गायगोठा (कळंभई) येथील अरविंद स्मृती संचलित आश्रमशाळेच्या संपर्कात आल्या. तेथील अडचणी पाहून दरवर्षी त्यांना औषधे, सतरंज्या, पांघरूणे मिळवून देणे अशी मदत करीत असतात. यामध्ये त्यांचे सीए असलेले पती मिलिंद हे त्यांना मदत करीत असतात. अशातच २०१५ साली वीणातार्इंची कन्या सायली ज्ञाते हिचा विवाह ठाण्यातील शिर्वन ठाणेकर यांच्याशी ठरला. त्यावेळी वीणातार्इंनी शिर्वनच्या पालकांशी संवाद साधून अहेराची रक्कम आश्रमशाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी खर्च करण्यासाठी सुचविले. लग्नपत्रिकेतही अहेराची रक्कम या सामाजिक कार्यासाठी वापरणार असल्याची कल्पना अन्य आप्तांना दिली. अहेराच्या रकमेत आपल्याकडील रकमेची भर घालून वर्गखोल्यांचे बांधकाम केले. दुर्गम भागातील आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन १९९८ साली ही आश्रमशाळा सुरू झाली. आज ६५० विद्यार्थी या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये ३१० विद्यार्थिनी आहेत. आज सुसज्ज अशा बांधलेल्या वर्गखोल्यांमध्ये येथील विद्यार्थी मोठ्या आनंदाने शिक्षण घेत आहेत.>आश्रमशाळेतील समस्या सोडविण्यासाठी वीणाताई ज्ञाते या वेळोवेळी आम्हाला सहकार्य करीत असतात. त्यांच्या या कार्यामुळे आम्हालाही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन संस्कारित करण्यासाठी प्रेरणा मिळते.- संगीता भोईर, मुख्याध्यापिका