शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

निकालापूर्वीच दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 12, 2017 16:58 IST

येथील पाटीलनगर भागात राहणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वीच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क:सिडको : येथील पाटीलनगर भागात राहणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वीच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, कालिका पार्क, पाटीलनगर येथे कालिदास मुंगेकर हे गेल्या २० वर्षांपासून राहात आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा कौस्तुभ (१५) हा तिडके कॉलनी येथील सेंट फ्रान्सिस शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता व त्याने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. दहावीचा निकाल अद्याप लागला नसून त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाची तारीख देण्यात येत होती. आज दहावीचा निकाल असे सोशल मीडियावर दिवसभर संदेश फिरत असल्याने आपण पास होऊ की नाही याचा कौस्तुभने धसका घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, रविवारी (दि.११) कौस्तुभ व त्याचे आई-वडील रात्री उशिरापर्यंत घरात गप्पा मारत बसले होते. यानंतर सर्व झोपल्यानंतर कौस्तुभने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील कालिदास हे पहाटे चार वाजता उठले असता त्यांना कौस्तुभने आत्महत्या केल्याचे आढळून आले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयत कौस्तुभ हा एकुलता एक मुलगा होता. कौस्तुभच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.