शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड घोटाळाप्रकरणी सिडकोच्या दोघांना अटक

By admin | Updated: May 14, 2017 02:00 IST

साडेबारा टक्केअंतर्गत वाटपासाठी राखीव असलेला भूखंड लाटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : साडेबारा टक्केअंतर्गत वाटपासाठी राखीव असलेला भूखंड लाटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये सिडकोच्या भूमापन विभागातील दोघा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांनी संबंधितांना बेकायदेशीररीत्या भूखंडाचे सीमांकन करून देऊन भूखंड हडपण्यास मदत केली होती.ऐरोली, सेक्टर २० येथील भूखंड क्रमांक ५३/५ हा सिडकोने साडेबारा टक्के अंतर्गत वाटपासाठी आरक्षित ठेवला होता. मात्र, हा भूखंड कोणाला वितरीत झालेला नसतानाही त्यावर इमारत बांधून घरांची विक्री सुरू होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सिडकोच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कृष्णा डेव्हलपर्सचे बांधकाम व्यावसायिक राजू चौधरी व नमुर पटेल या दोघांना अटक केली होती; परंतु सिडकोचे भूखंड हडपणारे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता होती. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणासह अशा अनेक गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा कक्ष-दोनकडे सोपवला आहे. यानुसार उपआयुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजू सोनवणे यांचे पथक तपास करत होते. तपासांती सोनवणे यांच्या पथकाने सिडकोचे वितरीत न झालेले भूखंड हडपणारे रॅकेट उघड करून त्यांना मदत करणाऱ्या सिडकोच्या दोघा अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांना अटक केली आहे. प्रभाकर आत्माराम म्हात्रे (५१), सुनील अनंत फडके (४०), लवेश रघुनाथ जाधव (३७), नझीर शेख व दत्तात्रेय मुकादम अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी शेख हा सिडकोच्या भूमापन विभागातील मुख्य भूमापक अधिकारी, तर मुकादम हा भूमापन सेवक आहे. त्यांनी प्रभाकर, सुनील व लवेश यांना ऐरोली सेक्टर २० येथील ५३/५ क्रमांकाचा भूखंड हडप करण्यास मदत केली होती. सदर भूखंड अद्याप कोणाला वितरीत झालेला नसल्याची माहिती शेख व मुकादम यांना होती. यानुसार त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बेकायदेशीररीत्या भूखंडाचे सीमांकन करून दिले होते. यानंतर प्रभाकर व त्याच्या साथीदारांनी भूखंड वितरीत झाल्याची बनावट कागदपत्रे तयार करून तो भूखंड कृष्णा डेव्हलपर्सला विकला होता. याच कागदपत्रांच्या आधारे कृष्णा डेव्हलपर्सचे राजू चौधरी व नमुर पटेल यांनी महापालिकेकडून बांधकामासाठी सीसी घेऊन इमारत उभारल्यानंतर ओसीही घेतली आहे. मात्र, भूखंडावर इमारत उभी राहिल्यानंतर जागे झालेल्या सिडको अधिकाऱ्यांनी संबंधितांविरोधात भूखंड लाटल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. हा गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग झाल्यानंतर सिडकोचे भूखंड हडपणारे हे रॅकेट उघड झाले आहे. यानुसार प्रभाकर म्हात्रे, सुनील फडके, लवेश जाधव, नझीर शेख व दत्तात्रेय मुकादम यांना अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी सांगितले.>बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड हडपल्याचे उघड झाल्यानंतर त्या ठिकाणी उभारलेल्या इमारतीची पालिकेने सीसी व ओसी रद्द केली आहे. यामुळे तिथल्या रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या वेळी अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय असे गुन्हे करणे संबंधितांना शक्य नसल्याचा ठपका ठेवत सखोल चौकशीच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्यामार्फत सिडकोच्या सर्वच भूखंड घोटाळ्यांचा तपास सुरू आहे.