शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या अधिकाराला कात्री

By admin | Updated: May 18, 2016 03:27 IST

प्रस्तावित पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोच्या अधिकार क्षेत्राला कात्री लागणार आहे

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- प्रस्तावित पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोच्या अधिकार क्षेत्राला कात्री लागणार आहे. पनवेल महापालिकेत कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, तळोजा या सिडको वसाहतीबरोबरच आजूबाजूच्या ६८ गावांचा समावेश होणार आहे. पनवेल महापालिकेत खारघरचा समावेश करण्यास सिडकोने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे नव्या महापालिकेमुळे सिडकोचे कार्यक्षेत्र केवळ प्रस्तावित पुष्पकनगर आणि खारघर इथपर्यंतच मर्यादित राहणार आहे.कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रस्तावित महापालिकेबाबतचा आपला अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेचा मुहूर्त समीप आल्याने संबंधित सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पनवेल महापालिकेमुळे सिडकोच्या चार वसाहतींसह नगरपालिका कार्यक्षेत्रातील ६८ गावे विकासाच्या टप्प्यात येणार आहेत. असे असले तरी यामुळे सिडकोच्या कार्यक्षेत्राला मात्र मर्यादा पडणार आहेत. नवी मुंबई शहराची निर्मिती करताना सिडकोने १४ नोड्स विकसित केले आहेत. त्यापैकी वाशी, ऐरोली, नेरूळ, सानपाडा, कोपरखैरणे आणि सीबीडी-बेलापूर हे सात नोड्स नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. तर उर्वरित खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे, उलवे, द्रोणागिरी व प्रस्तावित पुष्पकनगर हे सात नोड्स अद्याप सिडकोच्या ताब्यात आहेत. यापैकी कळंबोली, पनवेल, कामोठे, उलवे व द्रोणागिरी या वसाहतीचा प्रस्तावित पनवेल महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात सिडकोकडे फक्त खारघर आणि पुष्पकनगर हे दोनच नोड्स शिल्लक राहणार आहेत. विशेष म्हणजे स्मार्ट दक्षिण नवी मुंबई प्रकल्पाअंतर्गत सिडकोने कळंबोली, कामोठे, उलवे व पनवेल वसाहतीत कोट्यवधी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. त्यापैकी अनेक कामे सुरूही केली आहेत. पनवेल महापालिकेच्या अधिकृत स्थापनेनंतर विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.