शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा मागणाऱ्या वराला मिळाला चोप

By admin | Updated: April 20, 2016 00:32 IST

देवाणघेवाणीबाबत ठरल्यानुसार विवाह सोहळ्यात काही वस्तू, रक्कम मिळाली नाही, म्हणून नवरदेवाच्या नातेवाइकांनी वधू पक्षाच्या नातेवाइकांबरोबर हुज्जत घातली

काळेवाडी : देवाणघेवाणीबाबत ठरल्यानुसार विवाह सोहळ्यात काही वस्तू, रक्कम मिळाली नाही, म्हणून नवरदेवाच्या नातेवाइकांनी वधू पक्षाच्या नातेवाइकांबरोबर हुज्जत घातली. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. केवळ वधू-वर पक्षाकडील मंडळींतच भांडण झाले नाही, तर हुंड्याच्या रकमेसाठी आग्रही राहिलेल्या वराला वधूने चोप दिला. काळेवाडीतील मंगल कार्यालयात घडलेल्या या हाणामारीच्या घटनेची दखल पोलिसांनी घेतली. वधू-वर पक्षातील मंडळींना थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. योग्य ती समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले. त्यांच्यात समझोता होऊन अखेर सायंकाळी विवाह सोहळा पार पडला. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. नवरी मुलगी पुण्यातील, तर नवरदेव बाहेरगावचा. वाजतगाजत वधू आणि वर पक्षाकडील मंडळी मंगल कार्यालयात दाखल झाली. बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाच्या नातेवाइकांनी वधू पक्षाकडे हुंड्याच्या रकमेची मागणी केली. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने वर पक्षाकडील मंडळी संतापली. त्यांच्यातील वादाला तोंड फुटले. वधू आणि वर पक्षाकडील मंडळी एकमेकांवर धावून गेली. सनई,चौघड्याचे सूर कानी पडण्याऐवजी धक्काबुक्की, हमरातुमरी, शिवीगाळ असे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणात मंगल कार्यालयातील वातावरण बदलून गेले. (वार्ताहर)> पोलिसांकडून समझोताकोणी तरी याबाबत पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वधू आणि वर पक्षाकडील प्रमुख नातेवाईक आणि भांडणात सहभागी असलेल्यांना पोलीस ठाण्यात नेले. नटूनथटून आलेल्या वऱ्हाडी मंडळीला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. मंगल कार्यालयातून त्यांची वरात पोलीस ठाण्यात गेली. त्यामुळे त्या सर्वांची तारांबळ उडाली.ऐन विवाह सोहळ्यात हुंडा मागणे किती महागात पडू शकते, याची जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी नमते घेतले.