शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

चितळे समितीचा मंत्र्यांवर ठपका!

By admin | Updated: June 14, 2014 17:34 IST

राज्यातील काही सिंचन प्रकल्पांवर मंजुरीपेक्षा जास्त खर्च केला जात असल्याची बाब नियामक मंडळाच्या नजरेस आणूनसुद्धा वाढीव खर्चाला मंजुरी दिली

मुंबई : राज्यातील काही सिंचन प्रकल्पांवर मंजुरीपेक्षा जास्त खर्च केला जात असल्याची बाब नियामक मंडळाच्या नजरेस आणूनसुद्धा वाढीव खर्चाला मंजुरी दिली गेली, अशा प्रकरणांमध्ये मंडळाचे तत्कालीन सदस्य आणि पदसिद्ध अध्यक्ष असलेले त्या-त्या वेळचे जलसंपदामंत्री जबाबदार असल्याचा ठपका सिंचन घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठेवला आहे. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावरच हा ठपका आहे, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी केला.चितळे समितीचा अहवाल विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मांडला जाणार आहे. मात्र, फडणवीस यांनी हा अहवाल फोडल्याचा दावा केला. फडणवीस म्हणतात त्यावर विश्वास ठेवला, तर युती काळातील महादेवराव शिवणकर आणि एकनाथ खडसे यांच्यावरही ठपका ठेवला आहे, असा अर्थ होत असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने केला. फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना चितळे समितीच्या अहवालाचा काही भाग फोडला. (विशेष प्रतिनिधी)