शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

चिमुकल्यांचा राजस्थानमध्ये सौदा

By admin | Updated: November 3, 2016 01:46 IST

मुंबईसारख्या शहरातून नोकरीचे अमिष दाखवून तरुणींची राजस्थान, गुजरातच्या खेडेगावांमध्ये विक्री होत असल्याची प्रकरणे सुरु आहेत

मुंबई : मुंबईसारख्या शहरातून नोकरीचे अमिष दाखवून तरुणींची राजस्थान, गुजरातच्या खेडेगावांमध्ये विक्री होत असल्याची प्रकरणे सुरु आहेत. अशात मुंबईतून चोरी केलेल्या मुलींनाही अशा खेडेगावात लग्नासाठी विकले जात असल्याची खळबळजनक माहिती मुलुंड पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांत मुंबईतून बेपत्ता झालेल्या सुमारे ८०० मुलींमागेही हे रॅकेट आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.मुळात राजस्थान, गुजरात भागात मुलींचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे येथील पुरुष देशाच्या कानाकोपऱ्यातून पळवून आणलेल्या मुली खरेदी करुन त्यांच्याशी विवाह करत असल्याचेही उघडकीस आले. यापूर्वी पायधुनी पोलिसांनी अशाप्रकारे नोकरीचे अमिष दाखवून मुंबईतील तरुणींना येथे लग्नासाठी विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यापाठोपाठ मुलुंड पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला लग्नासाठी उभे केले जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. लग्न तसेच देहविक्री अथवा बारमध्ये काम करण्यासाठी या मुलींचा वापर केला जात असल्याचे समजते. मुलुंडच्या अशोक नगर परिसरातून गायब झालेल्या चिमुरडीच्या अपहरणानंतर मुलुंड पोलीस या टोळीपर्यंत पोहचले. पोलिसांनी मुंबई ठाणे परिसरात राहणाऱ्या या सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिलीप मनीराम धुरीया (३३), तुफान बिहारीलाल निशाद (३३), मोहम्मद शहाजाद शाह (३३), संगीता महादेव लगाडे (५०), मंगल शंकर चंदनशिवे (२६), ममता दिपक राज (२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या तिघीही बारमध्ये काम करतात.मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ४ वर्षाची चिमुरडी गायब झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. या टोळीतील दिलीप याने मुलीचे अपहरण करुन तिला मोहम्मदच्या स्वाधीन केले. त्यानंतर मोहम्मदने या मुलींना मुंब्रा येथे असलेल्या या तिघींकडे सोडले. त्यानंतर यामागे तिचा जवळचा नातेवाईक असलेला दिलीप असल्याचे समजताच त्याच्याही मुसक्या आवळल्या. या मुलीला राजस्थान येथे नेण्याच्या तयारीत असतानाच कल्याण येथून तिची सुटका केली. आणि आरोपींच्याही मुसक्या आवळल्या. त्यांच्या चौकशीत या मुलीचा ५५ हजार रुपयांत सौदा झाल्याचे समजले. यातील १५ हजाररुपये हे दिलीप आणि तुफानला मिळणार होते. त्यानंतर राजस्थान येथील गावात या मुलीला लग्नासाठी विकले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या मुलींसारख्या मुंबईतून गेल्या दहा महिन्यात जवळपास ८०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. यापैकी गेल्या आठ महिन्यात ४९३ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. मात्र उर्वरीत चिमुरड्यांचा अद्याप ठावठिकाणा नाही. त्यामुळे या चिमुकल्यांच्या मागेही या राजस्थानी टोळीचे कनेक्शन आहे का? याचा शोध पोलीस घेत आहे. मुलुंड पोलिसांचे पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. या टोळीच्या चौकशीत राजस्थान कनेक्शनच्या म्होरक्याचा शोध पोलीस घेत आहे. (प्रतिनिधी)>तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरीमुलुंड पोलीस उपायुक्त राजेश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस आयुक्त अनिल वलझाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव कसार, रावसाहेब जाधव, लता सुतार, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पानसरे, महेंद्र पुरी, पोलीस उप निरीक्षक घाडगे, तपासे, निलवे, वाघमारे, बोरसे यांनी ही कारवाई केली आहे.मुलांकडे लक्ष द्या..अल्पवयीन मुलांच्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव करून देणे. शिवाय ते कुठे जातात, कुणाशी बोलतात, याकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहेत.