शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

डायनिंग टेबलवर बसून मुले खातात खिचडी

By admin | Updated: June 26, 2017 02:33 IST

सुंदर बागेने नटलेला शाळा परिसर, आॅनलाइन अध्यापनासाठी सोलार व्हर्च्युअल क्लासरूम, माध्यान्ह भोजनासाठी डायनिंग टेबल

विजय सरवदे । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सुंदर बागेने नटलेला शाळा परिसर, आॅनलाइन अध्यापनासाठी सोलार व्हर्च्युअल क्लासरूम, माध्यान्ह भोजनासाठी डायनिंग टेबल, शुद्ध पाणी, प्रशस्त मैदान या सुविधा म्हटल्या की, आपल्या डोळ्यासमोर लगेच शहरातील मोठ्या शाळाच येतील, पण केवळ या साऱ्या सुविधाच नव्हे, तर गुणवत्ताही जपली आहे, औरंगाबाद जिल्ह्यात एका दुर्गम खेड्यातील जिल्हा परिषदेच्या वस्तीशाळेने अन् हा बदल घडविला आहे, एका ध्येयवेड्या शिक्षकाने. औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या सिल्लोडच्या पळशी शिवारात असलेली जि. प. बडक वस्तीशाळेचे शिक्षक प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत हे २००४मध्ये सुरुवातीला निमशिक्षक म्हणून सेवेत रूजू झाले. गावापासून दूर असलेल्या शेतवस्तीवर जिथे आजूबाजूला दूरपर्यंत आधुनिकतेचा कसलाही संबंध नाही, अशा ठिकाणी प्रकाशसिंग राजपूत यांनी अथक परिश्रमाच्या बळावर अनेक सुविधा निर्माण केल्या.या शाळेत २०१५मध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करून, लगेच ती सोलार सीस्टिमवर कार्यान्वित करण्यात आली. माध्यान्ह भोजन योजनेत दिली जाणारी खिचडी एकाच वेळी ५० विद्यार्थी खाऊ शकतील, असे डायनिंग टेबल तयार करण्यात आले. पाण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी शाळेलगत एक तलावही तयार करण्यात आला आहे.आता आजूबाजूच्या शेतवस्तीवरील मुलेही बडक वस्तीशाळेत शिक्षणासाठी दाखल होत आहेत. आज या वस्तीशाळेची विद्यार्थी संख्या ५०च्या जवळ पोहोचली आहे. राजपूत यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात अशा ८ शाळांमध्ये आधुनिक सुविधा निर्माण केल्या असून, सध्या या शाळांमध्ये विद्यार्थी संख्याही झपाट्याने वाढली आहे.