मुंबई : गणिताची परीक्षा म्हटल्यावर आकडेमोड करा, ताळेबंध मांडा, यामुळेच अनेक विद्यार्थ्यांना घाम फुटतो, पण मुंबईत आज वेगळीच परिस्थिती दिसून आली. अगदी ४ वर्षांच्या चिमुरड्या मुलांपासून १३ वर्षांच्या मुलांनी चक्क दोन मिनिटांत ८०० गणित सोडवली. वेगवान आकडेमोड करून, या मुलांनी अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. १३ व्या राज्यस्तरीय अबॅकस अँड मेंटल अरिथमेटिक स्पर्धेत ४ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. रविवारी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये अबॅकसची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, सर्जनशीलता, ऐकणे आणि फोटोग्राफिक मेमरीसारख्या कौशल्यात वृद्धी होते. गणिते सोडविण्याच्या वेग अबॅकस अथवा मेंटल अरिथमेटिकचा उपयोग करून प्रश्न सोडविले. यातील विद्यार्थ्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, झटपट आकडेमोड करताना अचूकतादेखील तितकीच असते. कमीत कमी वेळात गणिताची अचूक उत्तरे हे विद्यार्थी देतात. युनिव्हर्सल कॉन्सेप्ट मेंटल अरिथमेटिक सिस्टम (यूसीएएमएस) ही आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था मानसिक अंकगणित प्रशिक्षणात (मेंटल अरिथमेटिक ट्रेनिंग) जागतिक स्तरावर कार्यरत आहे. या स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ १७ जानेवारीला दादर येथील प्राचार्य वैद्य सभागृहात होणार आहे. या दिवशी दोन ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’चे किताब दिले जाणार आहे. सीनियरला (एफ, जी, एच आणि के श्रेणी) ३० हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे, तर ज्युनियरला (सी, डी आणि ई श्रेणी) ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. चॅम्पियन किताब पटकावणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मुलांनी ८ मिनिटांत सोडवली २०० गणिते
By admin | Updated: January 16, 2017 02:09 IST