शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुले मागू शकतात मृत आईचा नुकसान भरपाईतील हिस्सा; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 09:19 IST

उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिलेला निकाल रद्द करत दोन मुलांना दिलासा दिला. वडिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने रेल्वेने ठरविलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील मुलांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे.

मुंबई : रेल्वेने दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील हिस्सा मुलांना मिळाला असला, तरी ते  मृत आईचा नुकसानभरपाईच्या रकमेतील हिस्सा मागू शकतात, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिलेला निकाल रद्द करत दोन मुलांना दिलासा दिला. वडिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने रेल्वेने ठरविलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील मुलांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे.  त्यांच्या मृत आईचा व आजीचा हिस्सा त्यांना मिळू शकत नाही, असा आदेश रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिला. उच्च न्यायालयाने दोन्ही मुलांना न्यायाधिकरणात अर्ज करण्यास झालेला विलंब माफ करत रेल्वे अपघात न्यायाधिकरणाला या प्रकरणावर पुन्हा एकदा  निर्णय घेण्यास सांगितले. याचिकाकर्ते किरण व संतोष पायगोडे यांचे वडील दामोदर यांचा मार्च २००९मध्ये धावती ट्रेन पकडताना अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने रेल्वेने त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबाला म्हणजे आई, पत्नी आणि दोन मुलांना मिळून चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे ठरविले.आई व पत्नीला नुकसानभरपाईची रक्कम मिळेपर्यंत दोघींचा मृत्यू झाला. या रकमेवर कोणीही दावा करणारे नसल्याने अडीच लाख रुपये पोस्टाद्वारे परत गेले. त्यानंतर किरण व संतोष यांनी आई व आजीची नुकसानभरपाईची रक्कम कायद्याद्वारे किंवा त्यांचे वारस म्हणून आपल्याला मिळावी, अशी विनंती करणारा अर्ज रेल्वे अपघात न्यायाधिकरणाकडे केला. मात्र, त्यांना त्यांचा हिस्सा मिळाल्याने न्यायाधिकरणाने दोन्ही भावांना आई व आजीसाठी असलेली नुकसानभरपाईची रक्कम त्यांना मिळू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. 

मुले, नातवंडांचा कायदेशीर अधिकारनुकसानभरपाईची न दिलेली रक्कम आता या दोन महिलांची संपत्ती आहे. त्यावर त्यांच्या मुलाचा व नातवंडांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना त्यांच्या हिश्श्याची नुकसानभरपाईची रक्कम मिळाली म्हणजे ते आईच्या व आजीच्या नुकसानभरपाईच्या रकमेवर दावा करू शकत नाहीत, असे म्हणणे अयोग्य ठरेल, असे न्या. एस. के. शिंदे यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय