पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दिघी येथील एक वर्षाच्या मुलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्यांचा अकडा ११ वर पोहोचला आहे.विघ्नेश सांगडे (वय १) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. विघ्नेशच्या मुलाला २७ मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारादरम्यान, आज त्याचा मृत्यू झाला. आजअखेर स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या ७६ झाली असून, त्यापैकी १४ रुग्णांवर अतिदक्षता विभगात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूमुळे बालकाचा मृत्यू
By admin | Updated: April 6, 2017 01:03 IST