सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी काय टीका केली, हे मला माहीत नाही. ते माझ्या संघटनेचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्याविरोधात मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. माझा मुलगा सागर याची बागणी (ता. वाळवा) गटातील उमेदवारी खा. शेट्टी यांच्याशी चर्चा करूनच रयत विकास आघाडीच्या नेत्यांनी निश्चित केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खा. शेट्टी यांनी खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. (प्रतिनिधी)
शेट्टींशी चर्चा करूनच मुलाला उमेदवारी - खोत
By admin | Updated: February 15, 2017 00:46 IST