मुंबई : घराबाहेर खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीला घरात सामान भरण्यास मदत करण्याचे सांगून शेजारील तरुणानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी भांडुपमध्ये घडली. या घटनेमुळे भांडुपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संग्राम विकास जगताप (२८) असे शेजाऱ्याचे नाव असून, तो इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर आहे.भांडुप पश्चिमेकडील प्रतापनगर परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १० वर्षांची नेहा कुटुंबीयांसोबत राहते. तर त्याच इमारतीच्या तळमजल्यावर जगताप राहतो. गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास तो बॅगेत कपडे भरत होता. त्याच दरम्यान दोन मित्रांसोबत घराबाहेर खेळत असलेल्या नेहावर त्याची वाईट नजर पडली. त्याने तिला सामान भरण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. ती घरात येताच दरवाजा बंद केला. आणि नेहावर लैंगिक अत्याचार केले. भांडुप पोलीस याचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
चिमुरडीवर अत्याचार
By admin | Updated: March 3, 2017 01:57 IST