शहरं
Join us  
Trending Stories
1
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
2
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
3
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
5
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
7
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
8
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
9
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
10
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
11
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
12
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
13
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
14
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
15
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
16
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
17
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
20
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल

...तर भाजपापेक्षा सेनेचेच नुकसान, राष्ट्रवाद हवा की राष्ट्रवादी हे तुम्हीच ठरवा, खास मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 07:28 IST

स्वबळावर लढून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत करायची की राष्ट्रवादावर श्रद्धा असलेल्या भाजपासोबत राहायचे याचा विचार शिवसेनेने करावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला. ते लोकमतशी बोलत होते.

- यदु जोशीमुंबई  - स्वबळावर लढून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत करायची की राष्ट्रवादावर श्रद्धा असलेल्या भाजपासोबत राहायचे याचा विचार शिवसेनेने करावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला. ते लोकमतशी बोलत होते.मुख्यमंत्री परदेशी असताना सेनेने लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यावर ते म्हणाले, शिवसेना स्वबळावर लढल्यास नुकसान केवळ भाजपाचे होणार नाही. शिवसेनेचे नुकसान अधिक होईल.शिवसेनेने स्वबळावर लढण्याने भाजपाचे नुकसान होणार नाही का?आम्ही काँग्रेससोबत लढणार असे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. ते एकत्र लढणार असतील आणि शिवसेना वेगळी लढणार असेल तर नुकसान कोणाचे याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा. विरोधी पक्षांना मदत होईल, असा अजेंडा आखायचा का हे त्यांना एकदा ठरवावे लागेल.शिवसेना ठाम राहिली तर?...तर आमचीही स्वबळाची तयारी आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही वेगळे लढलो आणि सर्वाधिक जागा जिंकल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांत वेगळे लढूनही क्रमांक एकचे स्थान पटकावले. वेगळे लढूनही जिंकू शकतो हे भाजपाने सिद्ध केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे जे वेगवेगळे सर्व्हे येताहेत त्यातही भाजपाच अव्वल आहे.नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही?राणे यांचा पक्ष एनडीएमध्ये आल्याने आम्हाला बळच मिळालेले आहे. त्यांच्याबाबतचा निर्णय लवकरच झालेला दिसेल.ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी त्यांना पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडले जात आहे, असे म्हटले आहे. खडसेंबाबत आपली भूमिका काय?खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपाला त्यांची गरज आहे. ते उद्विग्नतेने काही बोलले असतील. त्यांच्या मनात काय गैरसमज आहेत ते जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. कधीही पक्ष सोडणार नाहीत.विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पोलीस हेरगिरी करीत असल्याचा आरोप केला आहे...आपली प्रतिक्रिया?राज्यातील विरोधी पक्षांमध्ये दमदार कामगिरी असलेला नेताच दिसत नाही. ‘कामगिरी’च नसलेल्यांची ‘हेरगिरी’ कशाला करणार? गमतीचा भाग जाऊ द्या पण विखे यांनी जो आरोप केला आहे त्याची मी निश्चितच चौकशी करेन.मॅग्नेटिक महाराष्ट्रसाठी डाओसमध्ये पेरणीडाओसमधील वर्ल्ड एकॉनॉमिक फोरममध्ये दरवर्षी चीनचा बोलबाला असतो. यंदा मात्र भारताचाच बोलबाला होता आणि त्याचा फायदा घेत फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणाºया ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक येण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली पेरणी आपल्याला करता आली, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आलेली दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण