शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत शिवसेनेसोबत युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:39 IST

भाजपची बैठक; दुष्काळाबाबत टीकेला उत्तर देण्याचा आदेश

- यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार की नाही या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रदेश भाजपच्या बैठकीत कोणतेही सूतोवाच केले नाही. शिवसेनेच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या नेते/कार्यकर्त्यांनी अतिशय चांगले काम केले, अशी शाबासकी मात्र त्यांनी दिली.

भाजपचे प्रदेश पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री यांची बैठक पक्षांच्या दादरमधील कार्यालयात आज झाली. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, पक्षाचे मंत्री प्रामुख्याने उपस्थित होते. येत्या विधानसभा निवडणुकीत युती होण्यासंदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात या बाबत उत्सुकता होती; पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी युतीची घोषणा करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आम्ही विधानसभेलादेखील एकत्रितपणे सामोरे जावू असे जाहीर केले होते. २३ तारखेच्या निकालानंतर भाजप युतीबाबत काय भूमिका घेते या बाबत उत्सुकता असेल. आजच्या बैठकीत काही जिल्हाध्यक्षांना लोकसभा निवडणुकीबाबत तसेच दुष्काळासंदर्भात बोलण्याची संधी देण्यात आली. एकाही जिल्हाध्यक्षाने शिवसेनेसोबत युती विधानसभेसाठीही कायम ठेवावी, अशी भूमिका मांडली नाही. शिवसेनेच्या मतदारसंघातील जिल्हाध्यक्षांनी, ‘आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय मन लावून काम केले, अनेक ठिकाणी तर आम्हीच प्रचाराची यंत्रणा राबविली’, असे बैठकीत सांगितले. त्यावर, भाजप-शिवसेनेचे साडेचार वर्षात बरेचदा तणावपूर्ण संबंध असूनही वर आम्ही युती केल्याबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम केले, अशी शाबासकी मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष दानवे व अन्य नेत्यांनीही मार्गदर्शन केले.

केंद्र व राज्य सरकारने अनेक लोकाभिमुख योजना आणल्या, त्यांचा मोठा फायदाही होत आहे पण आम्ही इतके सगळे केले हे सांगण्यात कमी पडतो, अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दुष्काळ हाताळण्याबाबत शरद पवार सरकारवर टीका करत आहेत पण त्यांच्या सत्ताकाळात दुष्काळ कसा हाताळला आणि आम्ही किती कामे केली हे आपण दणकून सांगितले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जल्लोष करा पण...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा दिल्लीत आपले सरकार येत आहे. परवा निकाल येतील तेव्हा जल्लोष नक्कीच करा पण राज्यात दुष्काळ आहे याचेही भान ठेवा. आपला जल्लोष हा टीकेचा विषय होता कामा नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.‘दुष्काळ निवारणात झोकून द्या’दुष्काळ निवारणाच्या कामात २५ मे नंतर पक्षातील प्रत्येकाने झोकून द्यावे. प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाचा सामना करण्यासाठीचा एक मोठा उपक्रम पक्षाच्या पातळीवर सुरू करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.!

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा