नांदेड : शिवसेनेच्या उपद्रवमुल्याला ब्रेक लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तडजोडीचा ह्यमनसे चित्रपट उद्योगह्ण केला, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी आज येथे केली़ लोकमतशी बोलताना ते म्हणाले, विद्यमान सरकारमध्ये शिवसेनेकडून होणाऱ्या वारंवार उपद्रवामुळे अस्वस्थता आहे़ सरकार बिथरले असून शिवसेनेला शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचा वापर केला़ खंडणीची टीका होवू लागल्यावर सारवासारव केली़ आपण मुख्यमंत्री असताना ‘माय नेम इज खान’ चित्रपटासंदर्भातील वादानंतर कायदेशीर भूमिका घेतली़ कुठल्याही दंडेलशाहीला थारा दिला नव्हता याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
शिवसेनेला ब्रेक लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मनसे चित्रपट - चव्हाण
By admin | Updated: October 28, 2016 01:20 IST