शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या उद्विग्नतेवर मुख्यमंत्र्यांची मलमपट्टी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:17 IST

‘माझ्याविरुद्ध आतापर्यंत एकही आरोप सिद्ध झाला नाही पण ३५-४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आरोप ज्यांनी लावले त्यांचे काय, त्यांच्यावर सरकार कुठली कारवाई करणार आहे, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला.

मुंबई  - ‘माझ्याविरुद्ध आतापर्यंत एकही आरोप सिद्ध झाला नाही पण ३५-४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आरोप ज्यांनी लावले त्यांचे काय, त्यांच्यावर सरकार कुठली कारवाई करणार आहे, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला. त्यावर, ‘अनेकदा खोटया तक्रारी करून लोकप्रतिनिधींना बदनाम केले जाते हे मान्य करताना अशा प्रकरणी सभागृहातील गटनेत्यांची बैठक घेण्यात येईल, अशी मलमपट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.चौकशीत दोषी असेल तर फासावर द्या, पण असे आरोप करणाºयांवर सरकारने काय कारवाई केली अशी विचारणा खडसे यांनी केली तेव्हा मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित होते. खडसे म्हणाले की, माझ्या पीएने ३० कोटींची लाच घेतल्याची बदनामी करण्यात आली. चौकशीत काहीही आढळले नाही. मंत्रिपदी असताना अनेक आरोप झाले. दोन वर्षे मी चौकशीच्या फेºयात अडकलो.सीआयडी, एसीबी, लोकायुक्त सर्व चौकशा झाल्या. जनतेसमोर नाथाभाऊ का नालायक आहे हे भासवण्याचा खोडसाळपणा काही जणांनी केला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.यावर मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा खोटया तक्रारी करून लोकप्रतिनिधींना बदनाम केले जाते हे मान्य करताना अशा प्रकरणी सभागृहातील सदस्यांनी एकत्र बसून विचार केला पाहिजे. याबाबत काय कारवाई करता येऊ शकेल यावर नियम तपासले जातील. यासंदर्भात गटनेत्यांची बैठक घेउन मार्ग काढण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले.हितेंद्र ठाकूर आक्रमकविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कथित आॅडिओ क्लिपवरून होत असलेल्या आरोपांबाबत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवेदन करीत खोटे आरोप करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली. स्वत:सोबतच इतरांवरही जे बेछूट आरोप होतात त्यांचा पाढाच त्यांनी वाचला. आरोपांमध्ये तथ्य असेल तर निश्चित कारवाई करा. पण सरसकट बदनामी कशाला, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Khadaseएकनाथ खडसे