शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसेंबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील- गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 17:47 IST

मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. खडसे मंत्रीमंडळात आले तर आनंदच होईल.

पुणे - भाजपा नेते एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चीट दिली आहे. त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असून न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा मंत्रीमंडळात येण्याचा मार्ग मोकळा होईल. मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. खडसे मंत्रीमंडळात आले तर आनंदच होईल, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी खडसे यांच्या मंत्रीमंडळातील पुनरागमानाबाबत आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, एसीबीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. त्यावर न्यायालयाचे समाधान झाले तर खडसेंचा मार्ग मोकळा होईल. त्यांना मंत्रीमंडळात घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांच्याकडे एक अनुभवी नेता म्हणून आम्ही पाहतो. विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. ते मंत्रीही राहिले असून प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. ते मंत्रीमंडळात आले तर त्याचा सरकार आणि पक्षालाही फायदा होईल. त्यांच्या अनुभवाची पक्षाला गरज आहे.

खडसे यांना क्लीनचीट मिळाल्याने विरोधकांकडून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. विरोधकांचे कामच ते आहे. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही. छगन भुजबळ अनेक दिवस तुरूंगात होते. त्यांना आता जामीन मिळाला आहे. अद्याप हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही. आघाडी सरकारच्या काळातच त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे आमच्या सरकारने त्यांना आतही टाकले नाही आणि बाहेरही काढले नाही. सरकार सुडबुध्दीने वागत नाही. अजूनही काही घोटळ्यांची चौकशी सुरू आहे. चुका केलेल्यांवर कारवाई होणारच आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

सतत मोर्चे योग्य नाहीशेतकरी संघटनांच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. सध्या दुध उत्पादकांसमोर अडचणी आहेत. याबाबत चर्चेतून मार्ग काढला जाईल. पण सातत्याने आंदोलन, मोर्चे काढणे योग्य नाही. एक जूनच्या संपाबाबतही सोमवारी अजित नवले यांच्याशी चर्चा केली जाणार आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले. सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सरकार संवेदनशील असल्याने मोर्चे काढले की प्रश्न मार्गी लागतात. असे लोकांना वाटते, अशी टिपणीही त्यांनी केली.