शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नव्या निकषानुसार लवकरच दुष्काळाची घोषणा करणार- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 17:57 IST

राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पीक उत्पादकतेवर परिणाम झाल्याची कबुली देत यंदा नव्या निकषावर दुष्काळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावती येथे दिली.

अमरावती : राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पीक उत्पादकतेवर परिणाम झाल्याची कबुली देत यंदा नव्या निकषावर दुष्काळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावती येथे दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कुणाच्या मागणीनुसार अथवा अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार यापुढे दुष्काळ जाहीर केला जाणार नाही. नवीन नियमानुसार कार्यवाही केली जाईल. त्याचा आढावा घेतल्यानंतर ३१ आॅक्टोबरला टंचाईस्थिती जाहीर करण्यात येईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पुढील वर्षीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामाला फटका बसणार आहे. यापुढे शास्त्रीय पद्धतीनुसारच दुष्काळ जाहीर केला जाईल. पेरणी, पाऊस, भूजल पातळी, उत्पादन याचा विचार नवीन नियमानुसार होईल.३१ आॅक्टोबरनंतर टंचाईस्थितीच्या अनुषंगाने उपाययोजनेचे निर्णय जाहीर केले जातील. केंद्र शासनाचे पथक पाहणीसाठी येईल. पाहणीनंतर व पूर्वीच्या स्थितीवरून उपाययोजना केल्या जातील. शेतक-यांना मदत व विमा देण्याबाबत तयारी केली आहे. धरणांतील पाणीसाठ्याबाबतदेखील आढावा घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पत्रकार परिषदेला आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, आ.अनिल बोंडे, आ. प्रभुदास भिलावेकर, आ.रमेश बुंदिले, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त पीयूषसिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, सीईओ मनीषा खत्री आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस