शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर; उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 15:22 IST

राज्यातील माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे. राज्यातील माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे.

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २५ ते २९ सप्टेंबरपर्यंत परदेश दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या परदेश दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाकडू टीका केली आहे. राज्यातील माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. हजारो अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधीत करत आहेत. तिथे बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

सरकारमध्ये असतानाही रस्त्यावर उतरलो आहे. सत्तेचे कौतुक नाही. हा आक्रोश कुपोषित बालकांचा असून पेटलेले आंदोलन भडकवायला आलेलो नाही तर आंदोलनाला ताकद द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे. तुमचा संप चिरडू देणार नाही. शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हंटलं.  ४ रुपये ९२ पैशांत पोषण आहार कसा देता? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. बाहेरील राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी बालकांचा मृत्यू होतो. इथे देशाच्या आधारस्तंभाने दम तोडला. हा शाप सरकारने लावून घेतला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उत्तर प्रदेशाता ऑक्सिजनच्या अभावामुळे बालकांच्या झालेल्या मृत्यूवरून सरकारवर टीका केली आहे. 

अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर या दोन्ही बहिणींमध्ये भांडण लावण्याचे काम सरकार करत आहे . तसे होऊ देऊ नका. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, अशी सरकारला विनंती करतो. लाडू द्यायचा की चिक्की हे मी सांगता. नाही. मात्र माता भगिनींच्या चुलीकडेही लक्ष द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सौभाग्य योजनेवरही टीका केली आहे. वीज जोडून सौभाग्य जपता येणार नाही, त्यासाठी माणसं जपा, असंही म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.