वसई: येथील तहसील कचेरीच्या पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अन्न व नागरीपुरवठा विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरु करण्यात आली आहे.वसई तहसील कचेरीत असलेल्या पुरवठा विभागाकडून तालुक्यात रेशन दुकानांवर धान्य व रॉकेलचा पुरवठा केला जातो. मात्र, रेशन दुकानदार पुरवठा अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्टाचार करीत असल्याने सर्वसामान्य आणि गरीबांना धान्य आणि रॉकेल मिळत नसल्याची तक्रार माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वतंत्र समिती नेमून त्याची चौकशी करण्याची मागणीही चोरघे यांनी केली होती. याची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश स्रेहा बोरगे यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)
वसई पुरवठा खात्याची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी
By admin | Updated: March 4, 2017 03:22 IST