शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
4
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
5
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
6
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
7
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
8
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
9
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
10
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
11
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
12
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
13
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
14
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
15
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
16
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
17
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
18
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
19
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
20
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?

मुख्यमंत्री, उद्धव हेच भ्रष्टाचाराला जबाबदार

By admin | Updated: February 18, 2017 00:30 IST

नारायण राणेंचा घणाघात : पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप का?

कुडाळ : उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस हेच भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा फेकाडा मुख्यमंत्री आपण पाहिला नाही. माझ्या लोकप्रतिनिधींना चोर म्हणणाऱ्या या चोरांना सोडणार नाही, असा इशारा देतानाच सेना-भाजपकडे पुरेसे उमेदवार नाहीत, ते आमच्याशी काय लढणार? असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सेना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिका निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करणारे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भ्रष्टाचाराला तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारासाठी त्यांनी एकमेकांवर बोट दाखविणे थांबवावे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील नवीन एस.टी. डेपो मैदानावर शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने जाहीर प्रचार सभा झाली. या प्रचार सभेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सुनील भोगटे, कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष दिनेश साळगावकर, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे, युवक काँग्रेसचे लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, राकेश कांदे, सुदन बांदिवडेकर, डॉ. जयेंद्र्र परूळेकर, अस्मिता बांदेकर, भाके वारंग, संदीप कदम, विशाल परब, काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार पक्षाचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी टीका करताना राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी माझ्याच जिल्ह्यात येऊन माझ्यावरच बोलण्याची हिम्मत करू नये. लोक त्यांना जुमानणार नाहीत. रविंद्र चव्हाणांसारखे मंत्री आमच्याकडे यात्रेत फिरतात. नगरपालिकेसाठी जिल्'ात फिरलेल्या चव्हाणांना केवळ कुडाळात आणि सावंतवाडी एकच उमेदवार निवडून आणता. वस्त्रहरण त्यांनी बघावे की राणेंची सभा लागते तेव्हा खुर्च्या कमी पडतात. वस्त्रहरण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची अवस्था पाहून त्यांच्याकडे वस्त्रच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यांचे वस्त्रहरण कसे करणार, असा टोला त्यांनी युती सरकारला लगावला.जनताच त्यांना घरी बसविणारकेंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना खासदार मी बनवले. प्रभू गरीब अजिबात नाहीत पण मुद्दामहून जिल्ह्यात फाटकी कपडे घालून फिरतात. कपटी पालकमंत्र्यांना सोडणार नाही. जनता आणि नारायण राणे असे समीकरण आहे. राणे कोकणी जनतेच्या मनात आहेत, त्यामुळे जनता सुडाचे राजकारण करणाऱ्यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असे राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या म्हणजे..नीतेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आपण खुर्च्या मोजत नव्हतो; तर भाजपत गेलेल्यांची राजकीय लायकी जनतेला दाखवित होतो. पंतप्रधानांना आणून देखील भाजपचा विधानसभेत पराभव झाला.जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ‘पालक’ या शब्दाचा अर्थ बदलला आहे. काँग्रेस व नारायण राणेंना घाबरून जिल्हा नियोजनची बैठक लावत नाहीत. पालकमंत्री महात्मा गांधींच्या विरोधातील नाटकाला पोलिस संरक्षण देतात. पण मराठा आरक्षण मोर्चाला पोलिस संरक्षण मात्र देत नाहीत, असा सवाल नीतेश राणेंनी उपस्थित केला.राणेंच्या हॉस्पिटलची परवानगी नाकारणे पालकमंत्र्यांच्या हातात आहे का? असती तरी परवानगी नाकारण्याची हिम्मत झाली नसती. हे हॉस्पिटल गुढी पाडव्याला सुरू करणार. सत्ता कोणाचीही असली तरी मला परवानगीची गरज नाही. हॉस्पिटलची परवानगी नाकारल्याची माहिती देणारा असा कपटी पालकमंत्री मी पाहिला नाही.