शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांचा दिमाखदार सोहळ्यात शपथविधी; ऐतिहासिक आझाद मैदानावर हजारो जनसमुदायाचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 07:48 IST

महायुती सरकारच्या शपथविधीत ठरल्याप्रमाणे या तीन जणांनीच शपथ घेतली.

मुंबई : हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत व मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत गुरुवारी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा दिमाखदारपणे पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महायुती सरकारच्या शपथविधीत ठरल्याप्रमाणे या तीन जणांनीच शपथ घेतली.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचे नाव पुकारताच आझाद मैदानावर उपस्थित जनसमुदायाने जल्लोष केला. फडणवीस शपथ सुरू करेपर्यंत टाळ्या व शिट्ट्यांनी मैदान दणाणून गेले. यावेळी ‘लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ...देवाभाऊ देवाभाऊ’, अशा घोषणाही सुरू होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांचे नाव पुकारण्यात आले. यावेळीही जनसमुदायाने जल्लोष केला.

दाेघांच्या जॅकेटची चर्चा...

nया सोहळ्यासाठी अजित पवार यांनी आपले लकी गुलाबी जॅकेट घातले होते, तर देवेंद्र फडंणवीस यांनीही याच रंगाशी मिळत्या जुळत्या रंगाचे जॅकेट घातले होते.

nएकनाथ शिंदे आपल्या नेहमीच्या पांढऱ्या शर्ट आणि पँट या पेहरावात होते. फडणवीस यांना जॅकेटबाबत विचारले असता दादांनी शिवून दिले असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.

मविआच्या नेत्यांची पाठ

nया सोहळ्यासाठी मविआच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांना फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र मविआचा एकही नेता या सोहळ्याला आला नाही.

nया नेत्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या, पण काही व्यक्तिगत कारणांनी ते येऊ शकले नाहीत, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.