शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

मुख्यमंत्र्यांची शरद पवारांशी चर्चा, विषय कर्जमाफीचा; पण राष्ट्रपतिपदासाठी मते मागितली?

By admin | Updated: June 24, 2017 02:46 IST

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा करायला आणि सल्ला घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा करायला आणि सल्ला घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रामनाथ कोविंद यांना मदत करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पवार यांना केल्याची चर्चा आहे.फडणवीस व पाटील हे पवार यांना भेटायला गेले, तेव्हा तिथे सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे हेही होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आपण नंतर भेटणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस व पवार यांच्यात बंद खोलीत कोविंद यांना राष्ट्रवादीची मते मिळावीत यासाठी चर्चा झाल्याचे कळते. राष्ट्रपती-पदाच्या निवडणुकीत व्हिप काढला जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची मते कोविंद यांच्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.