शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

मुख्यमंत्र्यांमुळे अडला निधी?

By admin | Updated: October 20, 2016 03:44 IST

अर्थसंकल्पातील तरतुदींना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने पालिकेने साहित्य संमेलनासाठी तरतूद केलेला ५० लाखांचा निधीही अडकून पडला आहे,

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या अर्थसंकल्पातील तरतुदींना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने पालिकेने साहित्य संमेलनासाठी तरतूद केलेला ५० लाखांचा निधीही अडकून पडला आहे, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. ही स्थगिती लवकरच उठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, निधी अडकण्यास भाजपा जबाबदार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सुचवले. त्याचवेळी २७ गावांच्या राजकारणात शिवसेनेला विरोध करणाऱ्यांचाही वचपा काढल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी तर पुढे पाऊल टाकत महापौरांना स्वागताध्यक्षपद दिले नसेल, तर पालिकेने संमेलनाला निधीच देऊ नये, अशी भूमिका घेत वादात तेल टाकले आहे.साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी बुधवारी महापौर देवळेकर आणि आयुक्त ई. रवींद्रन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यात त्यांनी संमेलनासाठी पालिकेचा निधी लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागताध्यक्ष झाल्यानंतर वझे यांनी प्रथमच या भेटी घेतल्या. संमेलन ज्या ठिकाणी होणार आहे, त्या डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाची लवकरच पाहणी करावी. आढावा घ्यावा आणि तेथील गैरसोयी दूर कराव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या चर्चेनंतर वझे यांनी महापौर देवळेकरांची भेट घेतली. तेव्हा मनसेचे गटनेते मंदार हळबे, काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे आणि शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)>राजकारण आले आड२७ गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघर्ष समितीत गुलाब वझे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्या समितीचे शिवसेनेशी पटलेले नाही. निवडणुकीच्या काळात ती समिती भाजपासोबत होती. आताही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण त्यांना मदत करत असल्याची चर्चा आहे. स्वागताध्यक्षपदाचा मान प्रथम नागरिक या नात्याने महापौरांना मिळावा, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होते.मात्र, संमेलनाला राजकीय स्वरूप येऊ नये, यासाठी आगरी युथ फोरमने ते पद आपल्याकडे ठेवले. त्यामुळे महापौर नाराज आहेत. त्यातही संमेलनाचे स्थळ ठरवताना महापौर कल्याणच्या बैठकीला हजर होते, पण त्यांनी डोंबिवलीचे प्रतिनिधित्व न केल्याने त्यांच्यावर तेव्हा साहित्यवर्तुळातून टीका झाली होती. या राजकारणाचा फटका संमेलनाला बसतो आहे. त्यातही भाजपाच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रस्तावांना स्थगिती दिली आहे. साहित्य संमेलनाच्या निधीसह सर्व प्रस्ताव उद्याच्या महासभेत येणार आहेत. ते महापौर मंजूर करून घेऊ शकतात. उरलेले प्रस्ताव त्यांनी अडवून ठेवू नयेत आणि मुख्यमंत्र्यांवर खापर फोडू नये, अशी भाजपाची भूमिका आहे.