शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी सांगली प्रकरण गंभीरपणे घ्यावे: पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:48 IST

अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत केलेला खून आहे, की सुपारी घेऊन पोलिसांनी केलेला एन्काऊंटर आहे, याविषयीची शंका उपस्थित होत आहे.

सांगली : अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत केलेला खून आहे, की सुपारी घेऊन पोलिसांनी केलेला एन्काऊंटर आहे, याविषयीची शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे पाहावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.चव्हाण यांनी सोमवारी सकाळी आमदार डॉ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्यासह कोथळे याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याप्रकरणी राज्य व केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.या घटनेला जबाबदार धरत सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व शहर पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे.सांगलीत कडकडीत बंद, दोन बसेसवर दगडफेकअनिकेतच्या मृत्यूप्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीने पुकारलेल्या सांगली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समितीने शहरातून मोटारसायकल रॅलीही काढली. दोन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली, तर एका ठिकाणी टायर पेटवून रस्त्यावर टाकण्यात आला.सोलापूर बंदला अल्प प्रतिसादसोलापूर विद्यापीठाचे नामकरण शिवयोगी सिद्धेश्वर विद्यापीठ करण्याऐवजी अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात शिवा संघटनेने सोमवारी पुकारलेल्या सोलापूर बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. येत्या १८ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीAniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरण