शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी केली वातानुकूलित शिवशाही बसची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 21:50 IST

एसटीच्या सेवेत दाखल झालेल्या वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बसची आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.

मुंबई, दि. 11 - एसटीच्या सेवेत दाखल झालेल्या वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बसची आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांसह शिवशाही बसची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी यावेळी दिली.दिवाकर रावते म्हणाले, प्रवाशांना अधिक सुखकर तसेच किफायतशीर दरात प्रवास करता यावा यासाठी तसेच खासगी वाहतुकीकडे वळलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळविण्यासाठी एसटी महामंडळ विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व सुविधांनीयुक्त, वातानुकूलित आणि आरामदायी अशा 2 हजार शिवशाही बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. या बस मुख्यत्वे करून लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला व आंतरराज्य मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे. सध्या मुंबई-रत्नागिरी व पुणे-लातूर या मार्गावर ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.इतर भागात टप्प्याटप्प्याने या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी दिली. या बससाठी प्रति प्रवासी प्रति किमी साधारण दीड रुपया इतका किफायतशीर दर आहे. बसमध्ये प्रत्येक प्रवाशास स्वतंत्र मोबाईल चार्जर, सीट बेल्ट, पुशबॅक पद्धतीच्या सीटस, दोन एलसीडी टीव्ही अशा सुविधा आहेत. पूर्ण वातानुकूलित आणि आरामदायी असलेली शिवशाही बस प्रवाशांच्या निश्चितच पसंतीस उतरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.