शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

मुख्यमंत्री पदावरून युतीत जुंपली!

By admin | Updated: June 3, 2014 01:19 IST

विधानसभेत सत्ता येण्याच्या आधीच मुख्यमंत्री कोण होणार, यावरून भाजपा व शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे.

भाजपाची फडणवीस यांना पसंती : संजय राऊत म्हणतात आमचाच मुख्यमंत्री 
मुंबई :  विधानसभेत सत्ता येण्याच्या आधीच मुख्यमंत्री कोण होणार, यावरून भाजपा व शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपा उघड बोलायला तयार नाही. गोपीनाथ मुंडे की देवेंद्र फडणवीस, यावरून भाजपामध्येच एकमत होत नाही़ पण शिवसेनेने मात्र शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात 
येईल, असे जाहीर करून खळबळ उडवून टाकली आहे.
‘महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ, केंद्रात भाजपा मोठा भाऊ,’ या न्यायानेच महायुतीत कोणाच्या कितीही जागा येऊ देत; पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी भाजपावर बॉम्बगोळा टाकला आहे. त्यामुळे ‘उपर नरेंद्र नीचे देवेंद्र’ ही भाजपाची घोषणा हवेतच विरून जाणार की काय, असे बोलले जात आहे.
खा. राऊत म्हणाले, कोण किती जागा लढवतो आणि कोणाच्या किती जागा येतात हा विषयच नाही़ केंद्रात भाजपाचा पंतप्रधान होईल आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री, हा युतीच्या स्थापनेपासूनचा धोरणात्मक निर्णय आहे. आज एनडीएसोबत जे घटक पक्ष आहेत ते कधीकाळी सगळे पळून गेलेले होते. 
मात्र भाजपाच्या संकटाच्या वेळी देखील आम्हीच सोबत होतो. आम्ही कधीही पाठ फिरवलेली नाही. त्यामुळे ‘वरती मोदीजी खाली उद्धवजी’ ही आमची घोषणा आजची नाही, असे खा. राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
या आधी देखील कमी जागा लढवून जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत़ त्यामुळे ज्याचे आमदार जास्त (पान 3 वर) 
 
(पान 1 वरून) त्या पक्षाचा मुख्यमंत्री असल्या गोष्टींना काही अर्थ नाही. युतीच्या स्थापनेच्यावेळी जे ठरले तेच कायम राहील, असेही खा. राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. 
शिवसेनेचे दबावतंत्र
राज्यात भाजपाचे 23 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाला जास्त जागा मिळाव्यात, अशी मागणी भाजपामधून जोर धरू लागली. त्यातच भाजपाने प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना प्रोजेक्ट करणो सुरू केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर अभिनंदन केले. त्यांचीच हवा होती, म्हणून सगळे निवडून आले, असे सांगत शिवसेनेचे यश देखील मोदींमुळे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते. 
मात्र दुस:याच दिवशी शिवसेनेच्या जल्लोष मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख देखील केला नाही. जे यश मिळाले त्यात 1क्क् टक्के वाटा शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी झटलेल्या कार्यकत्र्याचा आहे, असे सांगून टाकले. सेना या सगळ्यात भाजपावर दबावतंत्रचा वापर करीत असल्याचेही सूत्रंचे म्हणणो आहे.
मी कुठे गुजरातला माहिती होतो?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. पक्षाच्या एका उच्चस्तरीय बैठकीत देवेंद्र हे अजून नवखे आहेत. शहरी चेहरा आहे, असे सांगण्याचा प्रयत्न काही भाजपा नेत्यांनी केला. त्यावर मोदी म्हणाले, मी सहा वर्षे गुजरातपासून दूर होतो. अटलबिहारीजींनी आपल्याला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून पाठवले. मी आधी मुख्यमंत्री झालो नंतर आमदार. त्यानंतर माझी गुजरातला ओळख झाली. देवेंद्रच्या बाबतीत असे काहीच नव्हते. ते आमदार आहेत, शिवाय प्रदेशाध्यक्ष म्हणूनदेखील चांगले काम करीत आहेत. मोदींच्या या युक्तिवादावर काही ज्येष्ठ नेत्यांची बोलतीच बंद झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)
 
199क् पासून राज्यात भाजपा 117 आणि शिवसेना 171 जागा लढवत आली आहे.
च्सध्याच्या विधानसभेत भाजपाचे 44 आणि शिवसेनेचे 43 सदस्य आहेत.