शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

मुख्यमंत्र्यांनी अपुरी माहिती दिली -राणे

By admin | Updated: July 23, 2016 02:24 IST

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत विधान परिषदेत सुरू असलेल्या गंभीर चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाला बगल दिली

मुंबई : नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत विधान परिषदेत सुरू असलेल्या गंभीर चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाला बगल दिली. कोपर्डी घटनेबाबत त्यांनी चकार शब्द काढला नाही. शिवाय सिंधूदुर्गातील गुन्ह्यांची आणि कलमांची मुख्यमंत्र्यांनी अपुरी माहिती सभागृहासमोर ठेवल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केला. कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना बुधवारी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राणेंचा खरपूस समाचार घेतला होता. त्याचा संदर्भ देत राणे यांनी गुरुवारी नियम ४७ अन्वये स्वत:ची बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तब्बल २५ वेळा माझे नाव घेतले, मात्र माहिती अपुरी दिली. सिंधुदुर्गातील गुन्हे, कलमे वाचली; पण ती कोणावर लागली, कशासाठी लागली याची माहिती कोण देणार, असा सवाल राणे यांनी केला. शिवसेनेच्या स्थापनेपासून राजकारणात आहे. आंदोलने केली त्यामुळे पोलिसांचा नेहमी संबंध असल्याचा खुलासाही राणे यांनी केला.राणे यांच्या निवेदनावर वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आक्षेप घेतला. मात्र सभापती रामराजे निंबाळकर यांनी राणे यांना आपल्या अधिकारात बोलण्यास परवानगी दिली असल्याचे सांगत मंत्रीद्वयांना खाली बसवले. (प्रतिनिधी)