शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

मुख्यमंत्र्यांनी दिली तावडेंना क्लीन चिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 04:05 IST

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. तावडे ज्या कंपनीचे संचालक आहेत, त्या कंपनीत त्यांचे कोणतेही भागभांडवल नाही आणि त्यांचे पद अकार्यकारी स्वरुपाचे आहे.

मुंबई : शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. तावडे ज्या कंपनीचे संचालक आहेत, त्या कंपनीत त्यांचे कोणतेही भागभांडवल नाही आणि त्यांचे पद अकार्यकारी स्वरुपाचे आहे. शिवाय, सदर कंपनी सरकारला कोणतीच सेवा पुरवत नसल्याने आचारसंहितेचाही भंग होत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली.काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मंत्र्यांच्या आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांसाठी जी आचारसंहिता घालून दिली आहे, त्याचे महाराष्ट्रातील काही मंत्र्यानी उल्लंघन केले असून अशा मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रणपिसे यांनी केली. यावेळी तावडे यांचा नामोल्लेख करण्याचे मात्र त्यांनी टाळले. रणपिसे यांच्या मागणीला काँग्रेस सदस्य माणिकराव ठाकरे, संजय दत्त, जनार्दन चांदूरकर आणि राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली होती.