दोन दिवसाचा नागपूर दौरा : भरगच्च कार्यक्रम नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या २ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता जेट एअरवेजच्या विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर रॅलीने ते प्राईड हॉटेल चौकातील डॉ. हेडगेवार चौक येथे येतील. त्या ठिकाणी स्मारकास अभिवादन करतील. त्यानंतर ५ वाजता रॅलीनेच दीक्षाभूमीकडे प्रयाण करतील. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाला अभिवादन करतील. सायंकाळी ६ वाजता निवासस्थानी पोहोचतील. तेथे त्यांचे भेटीगाठी व स्वागत करण्यात येईल. सोमवार ३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी १० वाजता रामगिरी या शासकीय निवासस्थानी मिहान प्रकल्पाबाबतचा आढावा घेतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता नागपूर विभागाची आढावा बैठक घेतील. २ वाजताचा वेळ राखीव राहील. दुपारी ३ वाजता पुन्हा आढावा बैठक होईल. सायंकाळी ६ वाजता टिळक श्रमिक पत्रकार भवनात पत्रकारांशी वार्तालाप करतील.
मुख्यमंत्री फडणवीस आज येणार
By admin | Updated: November 2, 2014 01:02 IST