शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्वीडनच्या पंतप्रधानांशी मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा, महाराष्ट्राला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 03:24 IST

स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात आपला देश महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करेल, अशी ग्वाही स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीत दिली.

विशेष प्रतिनिधी मुंबई : स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात आपला देश महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करेल, अशी ग्वाही स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीत दिली.लॉफवेन-मुख्यमंत्री भेटीवेळी केंद्रीय मंत्री वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी स्टॉकहोममध्ये विविध उद्योगसमूह तसेच मान्यवरांशी संवाद साधला. भारत आणि स्वीडन बिझनेस लीडर्स राउंड टेबल या परिषदेत मुख्यमंत्र्यांचे भाषण झाले. स्कॅनिया समुहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मॅथियास कार्लबूम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नागपूरमध्ये कार्यरत या समुहाने राज्यातील इतर शहरांमध्ये वाहतुकीसाठी बायोगॅस सुविधा क्षेत्रात कामाची तयारी दर्शविली.उड्डाण आणि संरक्षण क्षेत्रातील सॅब उद्योग समुहाने या क्षेत्रातील सुविधांसोबतच तंत्रज्ञानही महाराष्ट्रात आणण्याची तयारी दाखवली आहे.पुण्यातील प्रकल्प विस्तारण्याचा एसकेएफचा निर्णयबेअरिंग आणि सील उत्पादन क्षेत्रातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या एसकेएफचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅलरिक डॅनियल्सन यांनी आज फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. पुण्यात या समुहाचा निर्मिती प्रकल्प असून त्यांनी महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्याचे ठरविले आहे. आराखडा लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस